कल्याण : घरी पाणी नसेल तर गृहिणींची दिवसभराची चिंता वाढते. मात्र रेल्वे स्थानकातील पाणीपुरवठा खंडित झालेलं तुम्ही ऐकलय का? अशीच बातमी समोर आली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी कल्याण रेल्वे स्थानकात पाणीबाणी सुरु होती. पाणी बिल थकल्यामुळे महापालिकेने ही कारवाई केली. या पाणीबाणीमुळे प्रवाशांसह रेल्वे कर्मचाऱ्यांचेही हाल झाले.
Donald Trump : जर करार केला नाही तर इराणवर बॉम्बफेक होईल; ट्रम्प यांचा इराणला इशारा
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण रेल्वे स्थानकात शनिवारपासून महापालिकेने पाणीपुरवठा खंडित केला होता. कल्याण रेल्वे स्थानकाचे तब्बल ४.४ कोटी रुपये पाणी बिल थकले होते. त्यामुळे महापालिकाने शनिवार संध्याकाळपासून पाणीपुरवठा बंद केला होता. यामुळे स्टेशनवरील प्रवाशांना खूप त्रास झाला. स्टेशनवर काम करणारे कर्मचारी, रेल्वे हॉस्पिटलमधील लोक, जीआरपी आणि आरपीएफ जवानांना पाण्यासाठी खूप गैरसोय झाली. महापालिकाने यापूर्वीही अनेक नोटिसा सेंट्रल रेल्वेला पाठवल्या होत्या. महापालिकाने २८ मार्च रोजी सेंट्रल रेल्वेला एक पत्र पाठवले होते. त्यात त्यांनी २४ तासांच्या आत पाणी बिल भरण्यास सांगितले होते. बिलामध्ये यावर्षीचे १.०४ कोटी रुपये आणि लेट फीचे ३१ लाख रुपये होते. असे पत्रात नमूद केले. शनिवारी संध्याकाळी बंद झालेला पाणीपुरवठा रविवारी रेल्वे अधिकाऱ्यांनी १.१७ कोटी रुपयांच्या चालू बिलाची भरपाई करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर पुन्हा सुरू करण्यात आला.