पुणे : पुणेकरांनो पाणी जपून वापरा. महापालिकेकडून उन्हाळ्यापूर्वीच्या तातडीच्या देखभाल दुरूस्तीसाठी येत्या गुरूवारी ( दि. ३) रोजी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि.४) रोजी सकाळी उशीरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा सुरळीत केला जाणार आहे.
Narendra Modi Private Secretary : कोण आहेत पंतप्रधान मोदींच्या खासगी सचिव ? जाणून घ्या
प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नवीन पर्वती जलशुध्दीकरण केंद्र (५०० एम.एल.डी.), जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व त्या अंतर्गत सर्व प्रमुख पाण्याच्या टाक्या, पर्वती टँकर पॉईंट, भामा आसखेड जलकेंद्र, लष्कर जलकेंद्र, होळकर जलकेंद्र, वडगाव जलकेंद्र परिसर, राजीव गांधी पंपिंग कात्रज चौक परिसर (केदारेश्वर टाकी, महादेवनगर टाकी, आगम मंदिर टाकी, श्रीहरी टाकी),
खडकवासला जॅकवेल वारजे फेज क्र. १ व २, वारजे जलकेंद्र व त्या अखत्यारीतील एस.एन.डी.टी., एच.एल.आर. व टाकी परिसर चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी परिसर, वारजे जलकेंद्र लगत जीएसआर टाकी परिसर, खडकवासला रॉ वॉटर, गणपती माथा व जुने वारजे जलकेंद्र, एस.एन.डी.टी. (एम.एल.आर.) परिसर व चतुश्रुगी टाकी परिसर तसेच कोंढवे- धावडे जलकेंद्र व रॉ वॉटर या सर्व ठिकाणी विद्युत व पंपिंग विषयक व स्थापत्य विषयक तातडीची कामे एकाच दिवशी केली जाणार आहेत.