Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीRBI Action : आरबीआयचा ‘या’ २ बड्या बँकांना दणका!

RBI Action : आरबीआयचा ‘या’ २ बड्या बँकांना दणका!

नवी दिल्ली : नियमांचे उल्लंघन करणे किंवा आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या बँकांबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कठोर पाऊले उचलत असते. काही दिवसांपूर्वी देशातील दोन बड्या बँकांवर आरबीआयकडून दंडात्मक कारवाई (RBI Action) करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा अशीच कारवाई आरबीआयने दोन बड्या बँकांवर केली आहे.

ST Bus : उन्हाळी सुट्टीसाठी एसटी प्रशासन सज्ज! दररोज धावणार ७६४ फेऱ्या

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या काही महिन्यांमध्ये देशातील अनेक बँकांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कठोर कारवाई केली आहे. यामध्ये आरबीआयने काही बँकांचे लायसन्स रद्द केले आहे तर काही बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. तर आता केवायसी (नो युअर कस्टमर) संदर्भातील सूचनांचे पालन न केल्यामुळे एचडीएफसी बँक आणि पंजाब अँड सिंध बँकेवर मध्यवर्ती बँकेकडून मोठी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, आरबीआयने (RBI) केलेल्या दोन्ही बँकांना लाखो रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. आरबीआयने केलेल्या दंडात्मक कारवाईमुळे संबंधित बँकेच्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु याचा ग्राहकांवर काय परिणाम होणार जाणून घ्या.

किती रुपयांचा दंड भरावा लागणार?

आरबीआयने नुकतेच एक महत्त्वाचे परिपत्रक जारी करत एचडीएफसी बँकेला ७५ लाख रुपयांचा दंड ठोठावला असून, पंजाब अँड सिंध बँकेला नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ६८.२० लाख रुपयांचा दंड भरावा लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

काय आहे कारण?

एचडीएफसी बँकेवर (HDFC Bank) हा दंड बँकिंग विनियमन अधिनियम १९४९ च्या कलम ४६(४)(आय) सह कलम ४७ए (१) (सी) च्या तरतुदींनुसार लावण्यात आला आहे. ३१ मार्च २०२३ पर्यंतच्या आर्थिक स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी बँकेचे वैधानिक परीक्षण करण्यात आले होते.

या चौकशीनंतर एचडीएफसी बँकेच्या उत्तरांचे मूल्यांकन करण्यात आले आणि त्यामध्ये आरोप योग्य असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले. एचडीएफसी बँकेने त्यांच्या ग्राहकांची जोखीम संकल्पनेनुसार योग्य प्रकारे वर्गवारी केली नव्हती. लघू, मध्यम आणि उच्च जोखीम श्रेणीप्रमाणे ग्राहकांचे वर्गीकरण करण्यात आले नव्हते. तसेच, प्रत्येक ग्राहकाला विशिष्ट ओळख क्रमांक देण्याऐवजी ठराविक ग्राहकांना समान क्रमांक देण्यात आले होते.

दुसरीकडे, पंजाब अँड सिंध बँकेबाबत (Punjab and Sindh Bank) बोलायचं झालं तर या बँकेवर देखील नियमांचे उल्लंघन केल्यामुळे दंड आकारण्यात आला आहे. बँकिंग विनियमन अधिनियम १९४९ च्या कलम ४६(४)(आय), ५१(१) सह कलम ४७ ए (१) (सी) च्या तरतुदींनुसार ६८.२० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

ग्राहकांवर काय परिणाम होणार?

मध्यवर्ती बँकेने या दोन्ही बँकांवर केलेली ही दंडात्मक कारवाईचा ग्राहकांवर कोणताच परिणाम होणार नाही. मध्यवर्ती बँकेने केलेली ही कारवाई एचडीएफसी बँक आणि पंजाब अँड सिंध बँकेवर असून दंडाची रक्कम ही फक्त बँकेकडून वसूल होणार आहे ग्राहकांना एकही रुपया द्यावा लागणार नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -