Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीपंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात!

दीपक मोहिते

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज पुण्याच्या (Pune) दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते एकूण १२ प्रकल्पाचे भुमीपूजन करणार आहेत. पण ज्या एस.पी.महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांची सभा होणार आहे, त्या मैदानावर प्रचंड चिखल झाल्यामुळे सभेची जागा बदलण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या (Election Commission) पथकाचा आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections 2024) दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (State Government) घाईघाईने या प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन उरकण्यात येत आहे. तसेच लवकरच आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्यामुळे मोदी व शहा या दोघांनी ” मिशन महाराष्ट्र,” हाती घेतले आहे. या अंतर्गत त्यांनी अनेक प्रकल्पाचा शुभारंभ करण्याचा सपाटा लावला आहे.

अवघ्या दीड तासाच्या त्यांच्या या दौऱ्यात ते अत्यंत वेगाने १२ प्रकल्पाचे भूमिपूजन व तसेच उदघाटने पार पाडणार आहेत. त्यानंतर ६.५५ वाजता ते दिल्लीकडे प्रयाण करणार आहेत.संध्याकाळी जर पुन्हा पावसाला सुरुवात झाली तर मोदी यांच्या सभेचे ठिकाण बदलण्यात येणार आहे, पर्यायी व्यवस्था म्हणून गणेश कला व संस्कृती मंडळाचे सभागृह राखीव ठेवण्यात आले आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत नागपूर, अमरावती, मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, ठाणे व सोलापूर,नांदेड,या शहरात भाजपला दारुण पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे मोदी व शहा यांनी या शहरात येजा सुरू केली आहे. त्यांच्या या दौऱ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हेदेखील पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -