मुंबई : राज्यभरातील अंगणवाडी सेविकांसंर्दभात (Anganwadi Sevika) मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) अंगणवाडी सेविकांनी बेमुदत संप (Strike) पुकारला आहे. याआधी ४ डिसेंबर २०२३ रोजी राज्यातील अंगणवाडी सेविकांनी राजव्यापी संप केला होता. मानधनात दरमहा ५ हजार रूपये वाढ होईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते. मात्र अद्यापही पगारवाढीसंदर्भात कोणताही प्रस्ताव दिला नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांनी पुन्हा एकदा संपाची हाक दिली आहे.
मानधनात वाढ करण्याच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांनी पुन्हा आक्रमक रुप धारण केले आहे. त्यामुळे राज्यातील अंगणवाडी सेविका आजपासून संपावर जाणार आहेत. तर येत्या २१ ऑगस्ट रोजी सेविका सरकार विरोधात मोर्चा काढणार असून यामध्ये २ लाख अंगणवाडी सेविका सहभागी होणार आहेत.
काय आहेत अंगणवाडी सेविकांच्या मागण्या?
- मानधनात वाढ करण्याचा निर्णय घ्यावा.
- कायदेशीररित्या ग्रॅच्युइटी देण्यात यावी.
- मान्य केल्याप्रमाणे मासिक पेन्शन योजना लागू करावी.
- प्रलंबित प्रस्ताव तत्काळ मान्य करावा.
अंगणवाडी सेविका व मदतनीसांना ग्रॅच्युइटी देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश