Saturday, June 21, 2025

Horoscope : यंदा श्रावणात जुळून आलाय शुभ योग; 'या' राशींचे उजळणार भाग्य

Horoscope : यंदा श्रावणात जुळून आलाय शुभ योग; 'या' राशींचे उजळणार भाग्य

मुंबई : हिंदू धर्मात श्रावण महिन्याला (Shravan Month) विशेष महत्त्व असते. यंदा श्रावणात ५ सोमवार आल्याने हा काळ अधिक महत्त्वाचा ठरला आहे. त्यातच श्रावणाची सुरुवातही सोमवारपासून झाली आहे. असा शुभ योग तब्बल ७१ वर्षांनंतर हा योग पुन्हा आला आहे. त्यामुळे यंदाचा श्रावण विशेष ठरला जात आहे.


ज्योतीषशास्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी श्रावणात गजकेसरी योग, धनलक्ष्मी योगासह अनेक शुभ योग तयार होत आहेत. याचा प्रभाव काही राशींवर पडला आहे. त्यामुळे या राशीतील लोकांना यंदाचा श्रावण महत्त्वाचा ठरत असून त्यांचे भाग्य देखील उजळणार आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी.



मेष (Aries)


श्रावण महिन्याच्या काळात मेष राशीतील लोकांना कामाच्या ठिकाणी यश मिळू शकेल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता असून या कालावधीत उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. तसेच नोकरीच्या नव्या संधीही या काळात उपलब्ध होऊ शकतात.



सिंह (Leo)


सिंह राशीसाठी श्रावण महिना शुभ ठरू शकतो. कामात उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात. या राशींच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. या राशींच्या लोकांवर महादेवाची विशेष कृपा असणार आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. राजकारणाशी निगडीत असलेल्यांसाठी हा काळ खूप चांगला आहे. तुम्हाला एखाद पद देखील मिळू शकतं.



मकर (Capricorn)


मकर राशीच्या लोकांना शंकराच्या कृपने सुखाचे दिवस येऊ शकतात. या लोकांना पैसे कमावण्याचे नवीन साधन मिळू शकतात. याशिवाय या लोकांना व्यवसायात धनलाभ होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना मेहनतीचे उत्तम फळ मिळेल आणि कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होऊ शकते. नाते संबंध चांगले राहतील.



धनु (Sagittarius)


या राशीतील लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना या काळात नवीन नोकरी मिळू शकते. तसेच नवीन व्यवसाय सुरू करणेही फायदेशीर ठरू शकते. या काळात गुंतवणूक केली तर या राशीच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो.


(टीप : वरील माहिती ज्योतिषांच्या आधारे दिली आहे. 'प्रहार' या कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही.)
Comments
Add Comment