भाईंदर : भाईंदर पूर्व येथील नवघर परिसरात लग्नठरले.कॉम या संस्थेच्या आयोजित करण्यात आलेला वधूवर परिचय मेळावा आज पार पडला. या कार्यक्रमाला तरुण-तरुणींचा उत्तम प्रतिसाद लाभला. साडेसातशेहुन अधिक लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
परिचय मेळाव्याच्या माध्यमातून मुला-मुलींना स्वतःच्या आवडीचा जोडीदार मिळावा या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान जर एखाद्या इच्छूक वर अथवा वधूला समोरची व्यक्ती आणि त्याचे गुण पटले असल्यास पुढील बोलणी करण्यासाठी “मॅजिक बॉक्स” नावाने विशेष सोय करण्यात आली आहे. परिचय मेळाव्या नंतर जवळपास २२ ते २५ लग्न जुळतील, असा विश्वास संस्थापक विनोद कदम यांनी व्यक्त केला आहे.