Thursday, July 3, 2025

प्रियांका की शिव? : ‘बिग बॉस 16’ चा विजेता कोण ठरणार?

प्रियांका की शिव? : ‘बिग बॉस 16’ चा विजेता कोण ठरणार?

मुंबई : ‘बिग बॉस 16’ चा ग्रँड फिनालेची वेळ जवळ येत आहे आणि चाहत्यांमध्ये विजेता कोण ठरणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. बिग बॉसच्या ट्रॉफीसाठी प्रियांका चहर चौधरी, शिव ठाकरे, एमसी स्टॅन, अर्चना गौतम यांच्यात तगडी स्पर्धा आहे.


प्रियांका आणि शिव सीझन 16 मधील सर्वात शक्तिशाली खेळाडू आहेत. दोघेही सुरुवातीपासूनच मनापासून खेळ खेळत आहेत. दोघांचा खेळ प्रेक्षकांनाही आवडला आहे. या दोघांपैकी एक बिग बॉसचा विजेता होईल, असे मानले जात आहे.
आज रात्री ७ वाजता ‘बिग बॉस 16’ चा ग्रँड फिनाले रंगणार आहे. हा सोहळा कलर्स टीव्हीवर दाखवला जाणार आहे. याशिवाय ओटीटी प्लॅटफॉर्म Voot आणि जिओ टीव्हीवरही प्रेक्षकांना हा शो पाहता येणार आहे.





विशेष आकर्षण असणारी ट्रॉफी


बिग बॉस १६ च्या विजेत्याला गोल्ड यूनिकॉर्नच्या डिझाइनची चमकदार ट्रॉफी दिली जाणार आहे. याशिवाय अगोदर बक्षिसाची रक्कम २१ लाख ८० हजार इतकी असणार आहे. तसेच विजेत्या स्पर्धकाला ग्रँड आय १० कारही बक्षिस म्हणून मिळणार आहे.

Comments
Add Comment