बदलापूर: बदलापूर औद्योगिक क्षेत्रातील मे. गगनगिरी एक्झीम केमिकल्स या कंपनीला आज सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास आग लागली़. या आगीत कंपनीत काम करणारे तीन कामगार जखमी झाल्याने त्यांना सेंट्रल हॉस्पिटल, उल्हासनगर येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले, असून त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत़
आगीचे वृत्त समजताच घटनास्थळी बदलापूर पोलीस अधिकारी व कर्मचारी, बदलापूर अग्निशमन दलाचे जवान हे २ फायर वाहनांसह, अंबरनाथ अग्निशमन दलाचे जवान १ फायर वाहनासह व १० खाजगी वॉटर टँकर वाहनांसह ४ रुग्णवाहिका दाखल झाल्या़. ही आग पूर्णपणे विझविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना दुपारी साडेचारच्या दरम्यान यश आले़