Pune Municipal Recruitment Scam : पुणे महापालिका भरती परीक्षेत हायटेक कॉपीचा पर्दाफाश; चष्म्यात स्पाय कॅमेरा, टॉयलेटमध्ये जाऊन ३० मिनिटांत सोडवले १०० प्रश्न

पुणे : पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरती परीक्षेत हायटेक पद्धतीने कॉपी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्पाय कॅमेरा असलेल्या चष्म्याच्या माध्यमातून प्रश्नपत्रिकेची माहिती बाहेर पाठवून कॉपी केल्याचा आरोप तीन उमेदवारांवर आहे. या प्रकरणी तीन उमेदवारांसह त्यांना मदत केल्याच्या आरोपावरून परीक्षा केंद्रातील दोन कर्मचाऱ्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिका प्रशासन आणि IBPSकडून सुमारे दीड महिना करण्यात आलेल्या फॉरेन्सिक आणि तांत्रिक तपासानंतर हा प्रकार उघडकीस आला. (Pune Municipal Recruitment Scam)



अर्धा तास फक्त प्रश्न वाचले; नंतर ३० मिनिटांत १०० प्रश्न


एकूण २०,७३५ उमेदवारांच्या ऑनलाइन लॉगशीटचा तांत्रिक तपास करण्यात आला. यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील आयकॉन डिजिटल झोन, चिखलठाणा परीक्षा केंद्रावरील तीन उमेदवारांची उत्तरं सोडवण्याची पद्धत संशयास्पद आढळली. या तिन्ही उमेदवारांनी परीक्षेच्या सुरुवातीच्या सुमारे ३० मिनिटांत केवळ स्क्रीनवरील प्रश्न वाचले. त्यानंतर ते स्वच्छतागृहात गेले. टॉयलेटमधून परतल्यानंतर त्यांनी अवघ्या ३० मिनिटांत तब्बल १०० प्रश्न वेगाने सोडवले. विशेष म्हणजे, रफशीटचा वापर न करता त्यांनी ९० पेक्षा अधिक प्रश्नांची अचूक उत्तरं दिल्याचे तपासात समोर आले. (Pune Municipal Recruitment Scam)



चष्म्यातील कॅमेऱ्याने प्रश्न बाहेर पाठवल्याचा संशय :


सीसीटीव्ही फुटेज आणि डिजिटल लॉग्सच्या विश्लेषणातून या गैरप्रकाराचा उलगडा झाला. उमेदवारांनी चष्म्यात लपवलेल्या गुप्त कॅमेऱ्याच्या माध्यमातून ऑनलाइन परीक्षेच्या स्क्रीनवरील प्रश्न बाहेर पाठवले आणि स्वच्छतागृहात जाऊन त्यांची उत्तरं मिळवल्याचा पोलिसांचा संशय आहे. (Pune Municipal Recruitment Scam)



पाच जणांवर गुन्हा दाखल :


या प्रकरणात तीन उमेदवार आणि दोन परीक्षा केंद्र कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये गजानन पाचे, शिवशंकर शेळगावे, विष्णूकांत वाघमारे हे उमेदवार, तर योगेश राठोड आणि विकास गायकवाड हे परीक्षा केंद्रातील कर्मचारी असल्याचे समोर आले आहे. (Pune Municipal Recruitment Scam)



'पेपर फुटलेला नाही, ही हायटेक कॉपी' :


पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी स्पष्ट केले की, कनिष्ठ अभियंता भरती परीक्षेचा पेपर फुटलेला नाही, तर हा हायटेक पद्धतीने केलेला गैरप्रकार आहे. पेपर फुटला असता तर सुरुवातीपासूनच अनेक उमेदवार वेगाने प्रश्न सोडवताना दिसले असते. मात्र, लॉगशीटच्या तपासात केवळ हे तीन उमेदवार संशयित आढळल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, महापालिकेतील १६९ पदांपैकी गैरप्रकाराशी संबंधित पदे वगळून उर्वरित १४६ पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. (Pune Municipal Recruitment Scam)



पोलिसांसमोर महत्त्वाचे प्रश्न :


या प्रकरणाच्या तपासात आता अनेक प्रश्नांची उत्तरं शोधली जात आहेत. चष्म्यातील कॅमेऱ्याच्या माध्यमातून ऑनलाइन स्क्रीनवरील माहिती बाहेर कशी पाठवण्यात आली? या गैरप्रकारात लाखो रुपयांची आर्थिक देवाणघेवाण झाली का? परीक्षा केंद्राच्या स्वच्छतागृहात नेटवर्क जॅमर नसल्याची माहिती आरोपींना आधीच कशी होती? तसेच चष्म्याद्वारे कॉपी करण्याची कल्पना नेमकी कोणी दिली आणि या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाईंड कोण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. (Pune Municipal Recruitment Scam)

Comments
Add Comment

FDA Raid : 'सिप्ला'च्या पुणे गोदामाचा औषध विक्री परवाना रद्द

- अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई; 'रिअॅक्टिन प्लस' औषधांचा साठाही जप्त मुंबई : प्रिस्क्रिप्शन औषध असलेल्या

Ashish Shelar : ॲड. आशिष शेलार यांची ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशनच्या अध्यक्षपदी निवड

मुंबई : "ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशन" (ESGF) च्या अध्यक्षपदाची धुरा राज्याचे इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान आणि

Ramdas Athawale : कामाठीपुऱ्यातील महिलांसोबत रामदास आठवलेंनी साजरे केले रक्षाबंधन; पुनर्वसन आणि रोजगारासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार

मुंबई : रक्षाबंधनाच्या निमित्ताने रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री

Pune-Mumbai Highway : काळोखात भरधाव कारचा भीषण अपघात; ओढ्यात कोसळून दोन तरुणांचा मृत्यू

लोणावळा : जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी, २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला.

Pune News : 'MH 12' ची जागा आता 'MH 61' ने घेतली; व्हीआयपी नंबरसाठी पुणेकरांची तुफान गर्दी  

पुणे: पुणेकरांच्या अस्मितेचा आणि जिव्हाळ्याचा विषय असलेली 'MH 12' वाहन नोंदणी मालिका संपल्यानंतर पुणे प्रादेशिक

Shilpa Gavare death case : शिल्पा गवारे मृत्यू प्रकरणाचा मुळापर्यंत तपास करा; डॉ. नीलम गोऱ्हेंची मागणी

पिंपरी-चिंचवड :  वाकडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरणाचा मुळापर्यंत जाऊन निष्पक्ष तपास करावा, अशी मागणी विधान