Ritu Tawde : महापौर बंगल्यातील कर्मचाऱ्यांसोबत महापौरांनी साजरी केली 'कृतज्ञतेची राखी'

मुंबई : "रक्षाबंधन सण हा केवळ रक्ताच्या नात्यापुरता मर्यादित नसून तो प्रेम, विश्वास, काळजी आणि संरक्षणाचा अतूट धागा आहे. दिवस-रात्र सेवा देणारे महापौर बंगल्यातील सर्व कर्मचारी हे आमचे कुटुंबच आहेत," असे भावोद्गार मुंबईच्या महापौर रितू तावडे (Ritu Tawde) यांनी काढले.



भायखळा येथील महापौर निवासस्थानी आज शुक्रवारी २८ ऑगस्ट २०२६ रोजी, महापौर बंगल्यातील सर्व कर्मचाऱ्यांसमवेत रक्षाबंधन सण कौटुंबिक वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी आमदार चित्राताई वाघ (Chitratai Wagh) यांची प्रमुख उपस्थिती होती.


महापौर रितू तावडे व आमदार चित्राताई वाघ यांनी कर्मचाऱ्यांना स्वतः राखी बांधून त्यांचे औक्षण केले तसेच त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सण-उत्सवाच्या काळातही कर्तव्यावर तत्पर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या छोटेखानी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Alert : ऑगस्टअखेर पावसाची उघडीप; मात्र ‘या’ जिल्ह्यांत जोरदार सरींचा अंदाज, २४ तासांसाठी यलो अलर्ट

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याचं चित्र आहे. बहुतांश भागांत अपेक्षित पाऊस न

Ritu Tawde : कर्करोगाच्या असह्य वेदनांवर प्रेमाची आणि विश्वासाची फुंकर

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचे चिमुकल्यांसमवेत रक्षाबंधन रोनाल्ड मॅकडोनाल्ड हाऊसमध्ये साजरा झाला अनोखा

Harish Bhandirge : राजावाडी रुग्णालयातील घटनांबाबत आरोग्य समिती अध्यक्ष हरीष भांदिर्गे यांची पाहणी

प्रसूती विभागातील तीन घटनांचा घेतला सविस्तर आढावा; डॉक्टरांशी साधला संवाद मुंबई : राजावाडी रुग्णालयातील

Cooper Hospital : कुपर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना संवाद कौशल्याचे प्रशिक्षण

डिजिटल क्ष-किरण यंत्रे बसवा, केमोथेरपी केंद्र त्वरित सुरू करा भाजपा मुंबई अध्यक्ष, आमदार अमित साटम यांची

Election Commission of India : मतदार यादीतून नाव वगळले का?

येत्या ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत पुन्हा नाव नोंदणीची संधी मुंबई : भारत निवडणूक आयोगाकडून १९ ऑगस्ट २०२६ रोजी मतदार

Ritu Tawde : महापौरांच्या गाडीतून त्या नवजात बाळाचा झाला गृहप्रवेश

बाळंतिणीच्या मदतीला धावून गेल्या महापौर मुंबई : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची प्रसारमाध्यमातून विविध