FDA Raid : 'सिप्ला'च्या पुणे गोदामाचा औषध विक्री परवाना रद्द

- अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई; 'रिअॅक्टिन प्लस' औषधांचा साठाही जप्त


मुंबई : प्रिस्क्रिप्शन औषध असलेल्या 'रिअॅक्टिन प्लस'च्या पॅकेजिंगवर परवानगी नसलेला जाहिरातीचा मजकूर प्रसिद्ध करण्यासह साठवणूक आणि वितरण व्यवस्थेत त्रुटी ठेवणे सिप्ला कंपनीला चांगलेच महागात पडले आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सिप्ला फार्मा अँड लाइफ सायन्सेस लिमिटेडच्या पुण्यातील वडकी येथील औषधविक्रीचे (सी अँड एफ) परवाने तात्काळ प्रभावाने रद्द केले आहेत. (FDA Raid)


एफडीएने जून २०२६ मध्ये वडकी येथील सिप्लाच्या मुख्य गोदामाची अचानक तपासणी केली असता, 'शेड्यूल एच' या प्रिस्क्रिप्शन प्रवर्गातील औषधाच्या पॅकेजिंगवर 'अनाल्जेसिक व अँटीपायरेटिक' असा विनापरवानगी मजकूर जाहिरातीच्या स्वरूपात छापल्याचे उघडकीस आले. औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम, १९४० नुसार हा प्रकार पूर्णपणे नियमांविरुद्ध होता. अशा प्रकारच्या जाहिरातीमुळे नागरिकांमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर औषधे घेण्याची, म्हणजेच 'सेल्फ-मेडिकेशन'ची प्रवृत्ती बळावून सार्वजनिक आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असा आक्षेप घेत एफडीएने हा साठा बाजारातून तत्काळ परत मागवण्याचे आदेश दिले होते. मात्र, कंपनीने प्रशासनाच्या या आदेशांचे आणि सूचनांचे अपेक्षित पालन केले नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. (FDA Raid)



या प्रकरणानंतर प्रशासनाने केलेल्या सखोल पडताळणीत सिप्लाच्या वितरण व्यवस्थेतील अनेक गंभीर त्रुटी चव्हाट्यावर आल्या. खरेदी-विक्रीचे अभिलेख, संगणकीकृत डेटा आणि गोदामातील प्रत्यक्ष साठ्यामध्ये मोठी तफावत आढळली. याशिवाय, औषधांचा साठा जमिनीवर ठेवण्यात आल्याचे आणि साठवणुकीसाठी आवश्यक असणाऱ्या 'पॅलेट' व 'रॅक'ची व्यवस्था अत्यंत अपुरी असल्याचे निदर्शनास आले. मुदतबाह्य औषधांच्या व्यवस्थापनाबाबतच्या प्रक्रियेतही अनियमितता आढळल्यामुळे कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. (FDA Raid)


संस्थेने सादर केलेले स्पष्टीकरण समाधानकारक नसल्यामुळे आणि नियमांचे जाणीवपूर्वक उल्लंघन झाल्याचे सिद्ध झाल्यामुळे, प्रशासनाने कायद्यातील तरतुदींनुसार हा परवाना रद्द केला आहे. नागरिकांचे आरोग्य आणि औषधांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही शिथिलता दाखवली जाणार नाही, असा इशारा या निमित्ताने एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. (FDA Raid)

Comments
Add Comment

Ashish Shelar : ॲड. आशिष शेलार यांची ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशनच्या अध्यक्षपदी निवड

मुंबई : "ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशन" (ESGF) च्या अध्यक्षपदाची धुरा राज्याचे इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान आणि

Ramdas Athawale : कामाठीपुऱ्यातील महिलांसोबत रामदास आठवलेंनी साजरे केले रक्षाबंधन; पुनर्वसन आणि रोजगारासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार

मुंबई : रक्षाबंधनाच्या निमित्ताने रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री

Pune-Mumbai Highway : काळोखात भरधाव कारचा भीषण अपघात; ओढ्यात कोसळून दोन तरुणांचा मृत्यू

लोणावळा : जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी, २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला.

Pune News : 'MH 12' ची जागा आता 'MH 61' ने घेतली; व्हीआयपी नंबरसाठी पुणेकरांची तुफान गर्दी  

पुणे: पुणेकरांच्या अस्मितेचा आणि जिव्हाळ्याचा विषय असलेली 'MH 12' वाहन नोंदणी मालिका संपल्यानंतर पुणे प्रादेशिक

Shilpa Gavare death case : शिल्पा गवारे मृत्यू प्रकरणाचा मुळापर्यंत तपास करा; डॉ. नीलम गोऱ्हेंची मागणी

पिंपरी-चिंचवड :  वाकडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरणाचा मुळापर्यंत जाऊन निष्पक्ष तपास करावा, अशी मागणी विधान

Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनाला ग्रहणाचा सावट नाही, पण सकाळचा मुहूर्त चुकला ? जाणून घ्या दुपारी राखी कधी बांधायची!

आज २८ ऑगस्ट रोजी देशभरात भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि पवित्र नात्याचा 'रक्षाबंधन' हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला