Powai Garden Redevelopment : पवईतील अटलबिहारी वाजपेयी आणि प्रमोद महाजन उद्याने टाकणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पवईतील अटलबिहारी वाजपेयी उद्यान आणि पवईतील प्रमोद महाजन वन उद्यानाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या उद्यानांतील सर्व साहित्यांची दुरुस्ती तसेच डागडुजी केली जाणार असून या उद्यानाच्या कामांसाठी प्रथमच विकासकांनी स्वारस्य दाखवले आहे. त्यामुळे मुंबईतील विकासक आता महापालिकेच्या उद्यानांच्या कंत्राट कामांकडे वळल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अटलबिहारी वाजपेयी आणि प्रमोद महाजन मैदाने कात टाकणार आहे. (Powai Garden Redevelopment)


पवई येथील अटलबिहारी वाजपेयी उद्यानाची दर्जोन्नती करण्याची मागणी अनेक महिन्यांपासून होत आहे. या उद्यानातील संरक्षक भित, पदपथ, मुख्य प्रवेश द्वार आदी तुटलेल्या अवस्थेत आहे. तसेच , गजेबो बांधणे, अस्तित्वात असलेली बैठक व्यवस्था तसेच शौचालय व पंप रूमची दुरूस्ती करणे, लहान मुलांची खेळाची उपकरणे बसविणे तसेच व्यायामाची उपकरणे बसविणे, रंगरंगोटी करणे, विद्युतीकरणाची कामे तसेच हिरवळीची कामे करणे आदींची मागणी होत असल्याने याच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात येत आहे. (Powai Garden Redevelopment)



त्याबरोबरच पवई येथील प्रमोद महाजन वन उद्यानाच्या विकासाची कामे हाती घेण्याची मागणी होत आहे. या वन उद्यानातील संरक्षक भिंतीच, पदपथाच, मुख्य प्रवेश द्वार तुटलेल्या अवस्थेत असून त्यांची दुरस्ती करणे, सध्या अस्तित्वात असलेल्या गजेबोची दुरूस्ती करणे, अस्तित्वात असलेल्या पाय-या, पूल वॉटर फॉल, सुरक्षा खोली, मीटर खोली यांचीही दुरूस्ती करून रंगरंगोटी करणे, विद्युत तसेच हिरवळीची कामे करणे करण्याची मागणी झाल्याने या दोन्ही उद्यानांच्या विकासासाठी तसेच डागडुजीसाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. (Powai Garden Redevelopment)



या दोन्ही उद्यानांच्या कामांची डागडुजी करण्यासाठी महापालिकेच्यावतीने. ए स्क्वेअर रिएलिटी यांची निवड करण्यात आली आहे. यासाठी ५ कोटी ६५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. आतापर्यंत या कामांसाठी उद्यान विभागाची कामे करणाऱ्या कंपनीच्यावतीने पुढाकार घेतला जात होता. परंतु आता या उद्यानांच्या डागडुजीच्या कामांसाठी विकासक असलेल्या कंपन्यांनी स्वारस्य दाखवल्याचे दिसून येत आहे. (Powai Garden Redevelopment)

Comments
Add Comment

Vakola River Waste Prevention : ज्ञानेश्वर नगर लगतच्या वाकोला नदीकाठी बसवणार जाळ्या

- नदीत जाणारा कचरा आता थेट रोखला जाणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) ज्ञानेश्वर नगर झोपडप‌ट्टीतील रहिवाशांकडून वाकोला

Ganeshotsav Devotee Insurance : सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींचे दर्शन घेण्यास भाविकांना विमा कवच

- राज्य शासनामार्फत विमा काढण्याची उबाठा नगरसेवकाची मागणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत गणेशोत्सव

Maharashtra Weather Alert : ऑगस्टअखेर पावसाची उघडीप; मात्र ‘या’ जिल्ह्यांत जोरदार सरींचा अंदाज, २४ तासांसाठी यलो अलर्ट

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याचं चित्र आहे. बहुतांश भागांत अपेक्षित पाऊस न

Ritu Tawde : कर्करोगाच्या असह्य वेदनांवर प्रेमाची आणि विश्वासाची फुंकर

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचे चिमुकल्यांसमवेत रक्षाबंधन रोनाल्ड मॅकडोनाल्ड हाऊसमध्ये साजरा झाला अनोखा

Ritu Tawde : महापौर बंगल्यातील कर्मचाऱ्यांसोबत महापौरांनी साजरी केली 'कृतज्ञतेची राखी'

मुंबई : "रक्षाबंधन सण हा केवळ रक्ताच्या नात्यापुरता मर्यादित नसून तो प्रेम, विश्वास, काळजी आणि संरक्षणाचा अतूट

Harish Bhandirge : राजावाडी रुग्णालयातील घटनांबाबत आरोग्य समिती अध्यक्ष हरीष भांदिर्गे यांची पाहणी

प्रसूती विभागातील तीन घटनांचा घेतला सविस्तर आढावा; डॉक्टरांशी साधला संवाद मुंबई : राजावाडी रुग्णालयातील