Ganeshotsav Devotee Insurance : सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींचे दर्शन घेण्यास भाविकांना विमा कवच

- राज्य शासनामार्फत विमा काढण्याची उबाठा नगरसेवकाची मागणी


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबईत गणेशोत्सव मोठ्याप्रमाणात आणि उत्साहात साजरा केला जात आहे. मुंबईतील गणेशोत्सवाची ख्याती जगभर असून या उत्सवात सहभागी होण्यासाठी भाविक आणि पर्यटक मुंबईतील विविध मंडळांच्या गणेशमूर्तींचे दर्शन घेत सजावटीचा आनंद लुटण्यासाठी गर्दी करत असतात. त्यामुळे अशाप्रकारे विविध मंडळांच्या गणेश मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना राज्य शासनामार्फत विमा संरक्षण उपलब्ध करून देण्याची मागणी उबाठा नगरसेवकाकडून केली जात आहे. विशेष म्हणजे सन २०१४ ते २०२९पर्यंत युतीचे सरकार असताना आणि सन २०१९ ते जुलै २०२२ पर्यंत उबाठाचे सरकार असताना या नगरसेवकांना अशी मागणी करून आपल्या सरकारकडून याचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करता आलेला नाही, त्या पक्षाचे नगरसेवक आता सरकार गेल्यानंतर ही मागणी लावून धरताना दिसत आहे. (Ganeshotsav Devotee Insurance)



उबाठाचे दक्षिण मुंबईतील उबाठा नगरसेवक किरण तावडे यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे ही मागणी केली आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या कालावधीत मोठ्‌या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे, विविध सार्वजनिक ठिकाणी तसेच गणेशोत्सव मंडपाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून, अशा गर्दीच्या परिस्थितीत कोणतीही अनुचित घटना अथवा दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गणेशोत्सवाच्या कालावधीत मुंबई शहरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विमा संरक्षण उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. अशाप्रमाणे विमा संरक्षण उपलब्ध झाल्यास, अनपेक्षित दुर्घटना अथवा आपत्कालिन परिस्थितीत संबंधित भाविकांना व त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक आधार मिळण्यास मदत होईल,असे नमुद केले आहे. (Ganeshotsav Devotee Insurance)



"महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्रीगणपतीची पुजा व उत्सव महाराष्ट्रात तसेच प्रामुख्याने मुंबई शहरात मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने विशेषतः परळ लालबाग ह्याठिकाणी मोठ्‌या प्रमाणावर साजरा केला जातो. महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख असलेल्या गणेशोत्सवास, राज्य शासनाकडून 'राज्य महोत्सव' म्हणून दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे आपण ही मागणी करत असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे श्रीगणेशोत्सवाच्या कालावधीत मुंबई शहरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना राज्य शासनामार्फत विमा संरक्षण उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही झाल्यास अनपेक्षित दुर्घटना अथवा आपत्कालिन परिस्थितीत संबंधित भाविकांना व त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक आधार मिळण्यास मदत होईल,असे त्यांनी स्पष्ट केले. (Ganeshotsav Devotee Insurance)

Comments
Add Comment

Vakola River Waste Prevention : ज्ञानेश्वर नगर लगतच्या वाकोला नदीकाठी बसवणार जाळ्या

- नदीत जाणारा कचरा आता थेट रोखला जाणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) ज्ञानेश्वर नगर झोपडप‌ट्टीतील रहिवाशांकडून वाकोला

Powai Garden Redevelopment : पवईतील अटलबिहारी वाजपेयी आणि प्रमोद महाजन उद्याने टाकणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पवईतील अटलबिहारी वाजपेयी उद्यान आणि पवईतील प्रमोद महाजन वन उद्यानाचे सुशोभीकरण

Maharashtra Weather Alert : ऑगस्टअखेर पावसाची उघडीप; मात्र ‘या’ जिल्ह्यांत जोरदार सरींचा अंदाज, २४ तासांसाठी यलो अलर्ट

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याचं चित्र आहे. बहुतांश भागांत अपेक्षित पाऊस न

Ritu Tawde : कर्करोगाच्या असह्य वेदनांवर प्रेमाची आणि विश्वासाची फुंकर

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचे चिमुकल्यांसमवेत रक्षाबंधन रोनाल्ड मॅकडोनाल्ड हाऊसमध्ये साजरा झाला अनोखा

Ritu Tawde : महापौर बंगल्यातील कर्मचाऱ्यांसोबत महापौरांनी साजरी केली 'कृतज्ञतेची राखी'

मुंबई : "रक्षाबंधन सण हा केवळ रक्ताच्या नात्यापुरता मर्यादित नसून तो प्रेम, विश्वास, काळजी आणि संरक्षणाचा अतूट

Harish Bhandirge : राजावाडी रुग्णालयातील घटनांबाबत आरोग्य समिती अध्यक्ष हरीष भांदिर्गे यांची पाहणी

प्रसूती विभागातील तीन घटनांचा घेतला सविस्तर आढावा; डॉक्टरांशी साधला संवाद मुंबई : राजावाडी रुग्णालयातील