बीड : परळी तालुक्यातील मैदवाडी सेवानगर तांडा परिसरात अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून घेऊन जात तिच्याशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नव्हे, तर मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध POCSO कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परळी ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मैदवाडी सेवानगर तांडा परिसरात हा प्रकार घडला आहे. रवी रामा पवार रा. मैंदवाडी सेवा नगर तांडा येथील आरोपीने अल्पवयीन मुलीला कथितरीत्या बळजबरीने मोटारसायकलवर बसवून नेले. त्यानंतर तिच्याशी लज्जा निर्माण होईल असे गैरवर्तन केले. या घटनेनंतर आरोपीने संबंधित मुलगी तसेच तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने त्या आशंका फेटाळून लावल्या आहेत, ज्यामध्ये असे म्हटले जात होते की गोबरधन योजनेअंतर्गत कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) ची ...
या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक 412/2026 दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम 137(2), 351(2), 74 तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम, 2012 (POCSO) मधील 8, 12 व संबंधित कलमांनुसार पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रकरणाचा तपास वरिष्ठांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पागोटे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मल्हारी शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पागोटे हे करीत आहेत.