Tuljapur News : आई तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्रोत्सव ११ ऑक्टोबरपासून; जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम पत्रिका आणि धार्मिक विधी



तुळजापूर: महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्रोत्सव यंदा ११ ते २७ ऑक्टोबर दरम्यान अतिशय उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात साजरा होणार आहे. या १५ दिवसांच्या सोहळ्यात घटस्थापनेपासून ते अश्विन पौर्णिमेपर्यंत विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत.



मंचकी निद्रेने होणार शारदीय उत्सवाची सुरुवात


मुख्य नवरात्रोत्सवापूर्वी ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळपासून तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेस प्रारंभ होईल. त्यानंतर ११ ऑक्टोबर रोजी पहाटे देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना, दुपारी घटस्थापना आणि रात्री छबिना मिरवणूक निघेल, ज्यामुळे अधिकृत नवरात्रोत्सवाला सुरुवात होईल.


amp/"> amp/" class="section-post-content-internal-post-title">Chinchpokli-cha Chintamani : यंदाच्या गणेशोत्सवात लालबाग-परळ होणार ‘तिरूपती’मय; ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’चा आगमन सोहळा थाटात संपन्न

मुंबई : मुंबईच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या इतिहासातील मानाचे पान असलेल्या लालबाग-परळ भागातील ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’चा आगमन सोहळा आज शनिवारी ...


नवरात्र महोत्सवाची मुख्य कार्यक्रम पत्रिका




  • १२ ते १४ ऑक्टोबर: देवीची नित्योपचार पूजा व रात्री छबिना मिरवणूक.




  • १५ ऑक्टोबर (ललिता पंचमी): दुपारी रथ अलंकार महापूजा व रात्री छबिना मिरवणूक.




  • १६ ऑक्टोबर: मुरली अलंकार पूजा व रात्री छबिना मिरवणूक.




  • १७ ऑक्टोबर: शेषशाही अलंकार पूजा व रात्री छबिना मिरवणूक.




  • १८ ऑक्टोबर: भवानी तलवार अलंकार पूजा व रात्री छबिना मिरवणूक.




  • १९ ऑक्टोबर (दुर्गाष्टमी): महिषासुर मर्दिनी अलंकार पूजा, वैदिक होम-हवन आणि रात्री छबिना मिरवणूक.




  • २० ऑक्टोबर (विजयादशमी/दसरा): दुपारी १२ वाजता होमावरील धार्मिक विधी, घटोत्थापन आणि रात्री नगरहून येणाऱ्या पलंग, पालखीची मिरवणूक.




  • २१ ऑक्टोबर: पहाटे सीमोल्लंघन सोहळा आणि त्यानंतर देवीची मंचकी निद्रा.




amp/"> amp/" class="section-post-content-internal-post-title">Chinchpokli-cha Chintamani : यंदाच्या गणेशोत्सवात लालबाग-परळ होणार ‘तिरूपती’मय; ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’चा आगमन सोहळा थाटात संपन्न

मुंबई : मुंबईच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या इतिहासातील मानाचे पान असलेल्या लालबाग-परळ भागातील ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’चा आगमन सोहळा आज शनिवारी ...


कोजागिरी पौर्णिमा आणि सोलापूरच्या काठ्यांचा सोहळा


सीमोल्लंघन सोहळ्यानंतर २१ ऑक्टोबर रोजी सकाळी माता नगरच्या पलंगावर विसावणार आहे. सलग ५ दिवसांच्या मंचकी निद्रेनंतर २६ ऑक्टोबर रोजी पहाटे तुळजाभवानी मातेची पुन्हा सिंहासनावर प्रतिष्ठापना केली जाईल. याच दिवशी दुपारी सोलापूरच्या शिवलाड तेली समाजाच्या मानाच्या काठ्यांचे शहरात आगमन होणार असून, रात्री सोलापूरच्या काठ्यांसह भव्य छबिना मिरवणूक काढली जाईल. तसेच २५ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे.


या उत्सवासाठी महाराष्ट्रासह शेजारच्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातूनही मोठ्या संख्येने भाविक तुळजापुरात दाखल होतात. भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे.




Tags
Tuljapur templeTuljapur NewsMaharashtra Religious NewsMarathi Religious NewsTuljapur Navratri 2026Tuljabhavani Navratri 2026Tuljabhavani Temple NewsSharadiya Navratri 2026Tuljapur Navratri scheduleTuljabhavani festival programmeJai TuljabhavaniJai BhavaniNavratri programme 2026Tuljabhavani darshanTuljapur darshanMaharashtra Navratri newsTuljapur latest newsNavratri festival Maharashtra

Comments
Add Comment

Smart Ration Card : स्मार्ट रेशन कार्ड वाटप सुरू; QR कोड असलेल्या अत्याधुनिक कार्डाची वैशिष्ट्ये आणि प्रक्रिया

महाराष्ट्रातील शिधापत्रिकाधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी असून, पारंपारिक कागदी रेशन कार्डऐवजी आता QR कोड

Jalgaon News : ...'जो दाग रह गये उन्हे मिटाके आऊंगा' ! 'सगळं सांभाळून घे दीदी, मी जातो' भावनिक मेसेज अन् रक्षाबंधनाच्या दिवशीच तरुणाचं टोकाचं पाऊल

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. सर्वत्र रक्षाबांधन या भाऊ- बहिणीच्या सणाचा उत्साह

Pune Municipal Recruitment Scam : पुणे महापालिका भरती परीक्षेत हायटेक कॉपीचा पर्दाफाश; चष्म्यात स्पाय कॅमेरा, टॉयलेटमध्ये जाऊन ३० मिनिटांत सोडवले १०० प्रश्न

पुणे : पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरती परीक्षेत हायटेक पद्धतीने कॉपी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला

FDA Raid : 'सिप्ला'च्या पुणे गोदामाचा औषध विक्री परवाना रद्द

- अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई; 'रिअॅक्टिन प्लस' औषधांचा साठाही जप्त मुंबई : प्रिस्क्रिप्शन औषध असलेल्या

Ashish Shelar : ॲड. आशिष शेलार यांची ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशनच्या अध्यक्षपदी निवड

मुंबई : "ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशन" (ESGF) च्या अध्यक्षपदाची धुरा राज्याचे इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान आणि

Ramdas Athawale : कामाठीपुऱ्यातील महिलांसोबत रामदास आठवलेंनी साजरे केले रक्षाबंधन; पुनर्वसन आणि रोजगारासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार

मुंबई : रक्षाबंधनाच्या निमित्ताने रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री