मुंबई : माणूस आणि प्राणी यांच्यातील भावभावना, नातेसंबंधांचे धागे मनोरंजक पद्धतीने उलगडणाऱ्या "कापूसकोंडा" या चित्रपटाची पहिली झलक खास रक्षाबंधनाच्या निमित्ताने आज सोशल मीडियावर लाँच करण्यात आली आहे. येत्या २३ ऑक्टोबरला "कापूसकोंडा" चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून, चित्रपटाची पहिली झलक पाहून चित्रपटाची उत्सुकता वाढवणारी आहे.
Central Railway : मध्य रेल्वेवर रविवारी ३० ऑगस्ट रोजी मेगा ब्लॉक; अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावणार, ट्रान्स-हार्बर सेवाही बंद
मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे अभियांत्रिकी आणि देखभालीची विविध कामे पूर्ण करण्यासाठी रविवार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी उपनगरीय मार्गांवर मेगा ...
पॅनोरामा स्टुडिओस प्रस्तुत व्हीपी माऊली ग्रुप ऑफ कंपनीज सह स्टोरीवाला फिल्म हा चित्रपट सादर करीत असून जास्वंद एंटरटेन्मेंट्स प्रा.लि. नी "कापूसकोंडा" या चित्रपटाची निर्मिती केली आहे. “कापूसकोंडा" चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सचिन मोहिते यांचं आहे. सचिन मोहिते, गणेश पंडित, ऋषिकेश तुरई यांनी चित्रपटाची पटकथा, संवादलेखन केलं आहे. सचिन पाटेकर यांनी छायांकनाची जबाबदारी निभावली आहे. गाणी संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी सुरबद्ध केली आहेत तर पार्श्वसंगीत अभिजीत हेगडेपाटील या चित्रपटाला लाभले आहे. चित्रपटाच्या गाण्यांना गायक अवधूत गुप्ते, पद्मनाभ गायकवाड यांचा स्वरसाज लाभला आहे. सुहास राणे यांनी ध्वनी तंत्रज्ञ म्हणून काम पाहिले आहे. अभिनेते सचिन पिळगांवकर व अभिनेत्री मधुराणी गोखले यांच्यासह नवीन पिढीतील अभिनेत्री अक्षता पाडगांवकर, जान्हवी तांबट आणि अभिनेता भूषण पाटील अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे. चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण कथानकाची गरज समजून लातूर जिल्ह्यातील अंधोरी या गावी करण्यात आले आहे. सचिन पिळगावकर याच्या नवरा माझा नवसाचा या चित्रपटात मधुराणी गोखले यांनी कँडी ही मजेशीर भूमिका साकारली होती. आता कापूसकोंडा या चित्रपटातून सचिन पिळगावकर आणि मधुराणी गोखले पुन्हा एकत्र आले आहेत.
Ramdas Athawale : कामाठीपुऱ्यातील महिलांसोबत रामदास आठवलेंनी साजरे केले रक्षाबंधन; पुनर्वसन आणि रोजगारासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार
मुंबई : रक्षाबंधनाच्या निमित्ताने रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कामाठीपुऱ्यातील ...
"कापूसकोंडा" चित्रपटाची कथा अत्यंत अनोखी आहे. मानवी नाते संबंध, कुटुंब, भावभावनांवर आधारित ही हळवी गोष्ट प्रेक्षकांना वेगळा अनुभव देणारी आहे. कापूसकोंड्याची गोष्ट ऐकली का? अशा व्हॉइसओव्हरनंतर मधुराणी गोखले आणि दोन मुली आश्चर्याने पाहताना दिसतात, त्यानंतर भांडीकुंडी इतस्ततः पसरलेल्या खोलीत सचिन पिळगावकर, मांडीवर कुत्रा असल्याने भेदरलेले दिसतात. त्यामुळे या दोन प्रसंगांतूनच कथानकाविषयीची कमालीची उत्सुकता वाढली आहे. उत्तम कथानकाला तितक्याच सक्षम अभिनयाची जोड असल्यानं हा चित्रपट मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे यात शंका नाही.