Nashik : कन्फयुजन ठेवूच नका ! उपकेंद्राला नवे नाव दिले जाणार नाही, 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्र' हेच नाव असणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Nashik : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विविध विकासकामांचे उदघाटन आणि लोकार्पणासाठी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. दिंडोरीतील कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या हस्ते संपन्न झाल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. या उपकेंद्राअंतर्गत जवळपास १९६ महाविद्यालये आणि ३२ संशोधन केंद्रे जोडली जाणार असून सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिक्षण व्यवस्थेचे विकेंद्रीकरण ही काळाची गरज असल्याचे सांगितले. नाशिकसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या प्रदेशासाठी स्वतंत्र उपकेंद्राची मागणी योग्य होती आणि ती आता पूर्ण झाल्याचेही त्यांनी नमूद केले.



उपकेंद्राच्या नावाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम


उपकेंद्राच्या नावाबाबत सुरू असलेल्या चर्चेलाही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला. 'या उपकेंद्राला कोणतेही नवे नाव दिले जाणार नाही. 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्र' हेच अधिकृत नाव राहील, असे ते म्हणाले. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की शिक्षण केवळ पदवीपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवणारे असावे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट यांसारख्या आधुनिक अभ्यासक्रमांवर भर देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.



नाशिक महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन बनेल


पुढे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिकमधील हॉर्टिकल्चर, फूड प्रोसेसिंग, फार्मास्युटिकल्स, ऑटोमोबाईल आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातील वाढत्या संधी लक्षात घेऊन, उद्योगांच्या गरजेनुसार अभ्यासक्रम तयार करण्याचे आवाहनही केले. नाशिकच्या औद्योगिक प्रगतीचा उल्लेख करत, पुढील पाच वर्षांत मुंबई आणि पुण्यानंतर नाशिक महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन बनेल असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.



उपकेंद्रामुळे विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाच्या नवीन संधी


या भागासाठी विद्यापीठाच्या उपकेंद्राची मागणी अनेक वर्षांपासून होती. त्या मागणीची आता पूर्तता झाली असून या उपकेंद्रामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, संशोधन आणि आधुनिक कौशल्य विकासाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण आणि उद्योग यांच्यातील दुवा अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार असल्याचे सांगत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट यांसारख्या अभ्यासक्रमांना प्राधान्य देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच विद्यापीठांनी इनोव्हेशन, स्टार्टअप्स आणि संशोधनाला चालना देत, उद्योगांना आवश्यक असलेले रोजगारक्षम मनुष्यबळ तयार करावे, असेही त्यांनी आवाहन केले.

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : 'सिंहस्थ कुंभमेळ्याला बदनाम करण्याचे कारस्थान यशस्वी होणार नाही'

नाशिक : सिंहस्थ महाकुंभमेळ्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून कुंभमेळ्याला विनाकारण बदनाम

Nepal Flood : नेपाळवर घोंगावत आहे पुन्हा महापुराचे संकट

काठमांडू : हिमस्खलन झाले, नदीच्या पाण्याची पातळी वाढली आणि नेपाळमध्ये अचानक महापूर (Flash Flood) आला. या संकटातून

Mohan Bhagwat : मोहन भागवतांना विरोध करणाऱ्या ममदानींचे संघांने टोचले कान, आयोजकांचे एक्स अकाऊंटही पुन्हा सुरू

न्यूयॉर्क : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दृष्टी आणि विचारसरणी यांविषयी अधिक जाणून घेण्यास इच्छुक असलेल्या

CM Devendra Fadnavis : 'शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी नवे तंत्रज्ञान आणि संशोधनाचा उपयोग आवश्यक'

नाशिक : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे.

Flood situation in Nepal : पूरग्रस्त नेपाळसाठी भारताची ‘एअर रिलीफ’; वायुसेनेने पोहोचवली 47.5 टन मदत

नवी दिल्ली : नेपाळमध्ये हिमनदीचा मोठा भाग तुटल्याने आलेल्या विनाशकारी पुरामुळे झालेल्या हानीचा सामना

Bank Holidays in September : सप्टेंबरमध्ये १२ दिवस बँका बंद! जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी

मुंबई : सप्टेंबर महिन्यात बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे असतील, तर ती आधीच पूर्ण करून घेणे ग्राहकांसाठी