Cooper Hospital Mumbai : कुपर रुग्णालयात येत्या मार्च पर्यंत मिळणार एमआयसीयू सुविधा

स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : विलेपार्ले येथील कुपर रुग्णालयात सध्या १० खाटांचे वैद्यकीय अतिदक्षता विभाग अर्थात मेडिकल इंटेसिव्ह केअर युनिट-एमआयसीयू बनवण्यास महापालिका स्थायी समितीने हिरवा दिवा दाखवला. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामुळे पुढील सहा महिन्यात याचे बांधकाम पूर्ण जाऊन मार्च २०२७ पर्यंत या एमआयसीयूची सेवा उपनगरातील रुग्णांना प्राप्त होणार आहे.



विलेपार्ले येथील डॉ. रुस्तम नर्सी कूपर महापालिका सर्वसाधारण रुग्णालय हे पश्चिम उपनगरातील एकूण ७०० रुग्णशय्या असलेले प्रमुख रुग्णालय आहे.
सद्यस्थितीत, कूपर रुग्णालयामध्ये १० रुग्णशय्या असलेला वैद्यकीय अतिदक्षता विभाग (एमआयसीयू) असून हा रुग्णालयीन इमारतीच्या उच्चस्तर 'एफ' विंग येथे कार्यरत आहे. कूपर महापालिका सर्वसाधारण रुग्णालयामध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता अतिरिक्त किमान २५ रुग्णशय्येचा वैद्यकीय अतिदक्षता विभाग सुरु करण्यासाठी मॅक एंटरप्रायझेस या कंपनीची निवड करण्यात आली असून याकरता १२,२८ कोटी रुपये व विविध करांसह १६.०२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.



याबाबतचा प्रस्ताव मंजुरीला आला असता मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी यासाठी ऑक्सिजन, व्हेंटिलिटर आदींची व्यवस्था काय आहे असा सवाल केला. तर भाजपाचे तेजिंदर सिंग तिवाना यांनी या प्रस्तावाच्या माध्यमातून ४ प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालयांमध्ये एम.आय.सी.यू ची किती सुविधा आहे याची माहिती देण्यात यावी. अशी विचारणा केली. तर भाजपाच्या प्रिती सातम यांनी सन २०१५पासून प्रमुख रुग्णालयाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतरही या रुग्णालयांत एमआयसीयूच्या केवळ १०खाटाच होत्या. म्हणजे आपण ११ वर्षांनंतर येथील एमआयसीयूची कक्ष वाढवून आता अधिक २५ खाटा वाढवायला निघालो आहे. मग एवढा विलंब का झाला. असा प्रश्न उपस्थित केला. तर उबाठाचे शैलेश फणसे यांनी उपनगरांत हे वैद्यकीय महाविद्यालय सुरू का केले असे सांगत या एम.आय.सी.यू ची किती आवश्यकता आहे हे विषद केले. तर या काँग्रेसचे अश्रफ आझमी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ.सईदा खान यांनी या चर्चेत भाग घेतला होता. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी हा प्रस्ताव मंजूर केला.

Comments
Add Comment

Keshav Srushti : केशवसृष्टीत सहल नेण्याचा काँग्रेस, सपाचा विरोध मोडून काढला

महापालिका सातवीच्या मुलांची सहल केशवसृष्टीत जाणारच, स्थायी समितीत प्रस्तावाला मंजुरी मुंबई (विशेष प्रतिनिधी)

Mumbai Mayor : मुंबईचा पुढील महापौर शिवसेनेचाच! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सध्या मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर असला तरी येणारा पुढील महापौर हा शिवसेनेचाच असेल

Kanjurmarg Station Footpath : कांजूरमार्ग रेल्वे स्थानक परिसरासह एलबीएसचा मार्गाच्या पदपथ होणार मोकळ्या

तब्बल या परिसरातील १००हून अधिक गाळ्यांवर होणार कारवाई मुंबई विशेष प्रतिनिधी : कांजूरमार्ग रेल्वेथ स्थानक

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद