- रेल्वेस्थानकासह काही भाग मोकळे सोडून व्यवसाय करण्यास मुभा,तरीही कारवाईची टांगती तलवार
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
मुंबई महापालिकेच्यावतीने पात्र फेरीवाल्यांना क्यु आर कोड आधारीत ओळखपत्र देण्यात आले असून अशाप्रकारे ओळखपत्र दिलेल्या फेरीवाल्यांना किमान न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करत व्यवसाय करण्यास परवानगी दिली जावी अशाप्रकारी भावनाच सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी व्यक्त केली.त्यानंतर स्वत: अतिरिक्त आयुक्त (शहर)प्राजक्ता लवंगारे यांनी ज्या फेरीवाल्यांजवळ क्यु आर कोड आधारीत ओळखपत्र आहेत त्यांना रेल्वे स्थानकसह महत्वाची ठिकाणे वगळता तात्पुरत्या स्वरुपात व्यवसाय करण्यास परवानगी दिली जाईल असे आश्वासनही स्थायी समितीत दिले होते. परंतु त्यानंतरही मुंबईतील फेरीवाल्यांवर सरसकट कारवाई सुरु आहे. गणपतीचा उत्सव असल्याने किमान आता जर क्यु आर कोड ओळखपत्र दिलेच आहे तर आम्ही न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करून तेवढ्या जागा रिकाम्या सोडून अन्य जागांवर व्यवसाय करतो अशी तयारी दर्शवूनही फेरीवाल्यांना महापालिका आणि पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे. (Mumbai Hawkers QR Code ID Card)
- भाजप-शिवसेनेत राजकीय नाट्य; खासदार ओमराजेंकडून राणा पाटलांना धोबीपछाड मुंबई : धाराशिव शहरात नगरसेवकांच्या फोडाफोडीच्या राजकारणावरून सत्ताधारी ...
पथविक्रेता सर्वेक्षणातून नोंदणीकृत झालेल्या मुंबईतील ९९ हजार ४३५ फेरीवाल्यांपैंकी आतापर्यंत ५५ हजार ६७७ पथविक्रेत्यांना क्यूआर कोड आधारित ओळखपत्र प्रदान करण्यात आले आहे. उर्वरित संख्या विचारात घेता, पडताळणीमध्ये ३ हजार ९५० अर्जदार हे मयत असल्याचे आढळले आहे. तर ३९हजार ८०८ जण हे एकतर संपर्क होवूनही कार्यालयांमध्ये आलेले नाहीत अथवा त्यांच्याशी संपर्क होवू शकलेला नाही. येत्या ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंतच्या वाढीव मुदतीत क्यूआर कोड आधारित ओळखपत्र वितरण प्रक्रिया सुरु राहील. यानंतर येणाऱ्या कोणत्याही फेरीवाल्यांना क्यूआर कोड आधारित ओळखपत्र वितरण केले जाणार नाही. दरम्यान, सर्वेत नाव असलेले पण मृत पावलेल्या फेरीवाल्यांच्या वारसांना ओळखपत्र देण्याबाबत अद्यापही कोणताही निर्णय झालेला नाही. (Mumbai Hawkers QR Code ID Card)
मुंबई : महागाईने आधीच त्रस्त असलेल्या मुंबईकरांच्या खिशावर आता रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढीचा भार पडणार आहे. 1 सप्टेंबर 2026 पासून मुंबई महानगर ...
दरम्यान, ज्या फेरीवाल्यांना क्यु आर कोड देण्यात आले आहे, त्यांना व्यवसाय करण्यास दिले जात नसल्याची खंत स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी मांडल्यानंतर प्रशासनाच्यावतीने उत्तर देताना अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी न्यायालयाच्या निर्देशानुसार रेल्वे स्थानक, मंडई, हॉस्पिटल, शाळा, कॉलेज, मंदिर आदींपासून १०० मीटर ते १५० मीटरची जी जागा सोडायची आहे, त्या परिसरात फेरीवाल्यांना मज्जाव करण्यात येईल. मात्र, याव्यतिरिक्त अन्य जागांमध्ये अशाप्रकारे ओळखपत्र दिलेल्या फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मुभा दिली जाईल. पण स्थायी समितीत अशाप्रकारे आश्वासन दिल्यांनतरही महापालिका आणि पोलिस आदींच्या माध्यमातून फेरीवाल्यांवर कारवाई केली जात आहे. सणाचे दिवस असल्याने, याच कालावधीत वर्षभराचा व्यवसाय करता येतो, पण महापालिका प्रशासनाचे अधिकारी ऐकत असले तरी पोलिसांकडून ही कारवाई सुरु असल्याने ओळखपत्र दिल्यानंतरही व्यवसाय करता येत नाही.अशी खंत दादरसह इतर ठिकाणच्या सर्वच फेरीवाल्यांनी मांडली आहे. (Mumbai Hawkers QR Code ID Card)
यासंदर्भात परवाना विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करत जिर्थे निर्बंध घातले आहे, त्या परिसरात अशा फेरीवाल्यांना मज्जाव करण्यात येत आहे. त्या व्यतिरिक्त त्यांना व्यवसाय करण्यास दिला जातो. परंतु नागरिकांकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करावी लागते. न्यायालयाचे तसे निर्देश असून जर नागरिकांना तक्रार केल्यास संबंधित फेरीवाल्यांवर कारवाई केली जावी असे नमुद असल्याने त्यानुसार तक्रारीनुसारच कारवाई केली जात असल्याचे परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. (Mumbai Hawkers QR Code ID Card)