अमरावती येथील जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात बालकांच्या देखभाल विभागात (SNCU) लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू आणि चार बालके जखमी झाल्याच्या घटनेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) स्वतःहून दखल घेतली आहे. या प्रकरणी आयोगाने महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावत दोन आठवड्यांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. (Amravati)
२४ ऑगस्ट २०२६ रोजी रुग्णालयाच्या नवजात बालकांच्या देखभाल विभागात आग लागली होती. व्हेंटिलेटर मशीनमध्ये झालेल्या स्फोटामुळे ही दुर्घटना घडल्याचे माध्यमांतील वृत्तात नमूद करण्यात आले आहे. या घटनेत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला, तर चार बालके जखमी झाली. माध्यमांतील वृत्तानुसार, घटना घडली त्यावेळी SNCUमध्ये एकूण नऊ नवजात बालके दाखल होती. जखमी झालेल्या चार बालकांपैकी एका बालकाची प्रकृती गंभीर असल्याचेही समोर आले आहे. (Amravati)
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांच्यावर केलेल्या टीकेला भाजपकडून ...
मानवाधिकार उल्लंघनाचा गंभीर प्रश्न
संबंधित घटनेबाबतची समोर आलेली माहिती खरी असल्यास, रुग्णालयातील नवजात बालकांच्या सुरक्षिततेशी संबंधित मानवाधिकार उल्लंघनाचा गंभीर प्रश्न निर्माण होतो, असे NHRCने म्हटले आहे. आयोगाने महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांकडून मागवलेल्या अहवालात जखमी बालकांच्या सध्याच्या आरोग्यस्थितीची माहिती, तसेच राज्य सरकारने जाहीर केलेल्या नुकसानभरपाईचे वितरण आणि लाभार्थ्यांना ती प्रत्यक्ष मिळाल्याचा तपशील देण्यास सांगितले आहे. या घटनेची चौकशी आणि रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेबाबत राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीकडे आता NHRCचे लक्ष राहणार आहे. (Amravati)





