Gold Rate Today : ग्राहकांसाठी सोन्यासारखी संधी! सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने तेजी पाहायला मिळत होती. मात्र आता सोन्याच्या दरात काहीशी घसरण झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 770 रुपयांची घट झाली असून, 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,62,980 रुपयांवर आला आहे. त्यामुळे सोने खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. (Gold rate)


अमेरिकन डॉलर आणि बाँड यील्डमध्ये झालेल्या घसरणीचा परिणाम सोन्याच्या किमतीवर झाल्याचे सांगितले जात आहे. मागील आठवडाभरात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. आता दर कमी झाल्याने लग्नसराईसाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोने घेणाऱ्यांसाठी ही घसरण महत्त्वाची ठरू शकते. मात्र, सोन्याचे दर बाजारातील परिस्थितीनुसार सतत बदलत असल्याने खरेदीपूर्वी ताजे दर तपासणे आवश्यक आहे. (Mumbai Gold Rate)



आजचे 24 कॅरेट सोन्याचे दर


1 ग्रॅम - 16,298 रुपये
8 ग्रॅम - 1,30,384 रुपये
10 ग्रॅम - 1,62,980 रुपये
100 ग्रॅम - 16,29,800 रुपये


आजचे 22 कॅरेट सोन्याचे दर


1 ग्रॅम - 14,940 रुपये
8 ग्रॅम - 1,19,520 रुपये
10 ग्रॅम - 1,49,400 रुपये
100 ग्रॅम - 14,94,000 रुपये


आजचे 18 कॅरेट सोन्याचे दर


1 ग्रॅम - 12,224 रुपये
8 ग्रॅम - 97,792 रुपये
10 ग्रॅम - 1,22,240 रुपये
100 ग्रॅम - 12,22,400 रुपये


दरम्यान, सोन्याच्या किमतीत झालेली आजची घसरण कायम राहील की पुन्हा दर वाढतील, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरची स्थिती आणि गुंतवणूकदारांचा कल यामुळे आगामी काळात सोन्याच्या दरात पुन्हा चढ-उतार होण्याची शक्यता आहे.


Comments
Add Comment

Hyperdontia Case : ११ वर्षाच्या मुलीच्या तोंडात असं काही पाहून डॉक्टरही झाले हैराण; जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण

Hyperdontia Case : दातदुखीच्या त्रासामुळे ११ वर्षांच्या मुलीला दंतवैद्याकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीदरम्यान

Festival Season Sugar Limit : सण-उत्सवांच्या काळात साखरेची झळ! स्विगी, झेप्टो, ब्लिंकिटसह डी-मार्टमध्ये साखर खरेदीवर निर्बंध

मुंबई : येत्या सणासुदीच्या दिवसांत प्रत्येक घरात विविध प्रकारचे गोडधोड पदार्थ आणि पारंपारिक मिठाया

OBC certificate : सुप्रिया सुळे, विखे पाटलांसह बड्या मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र

- काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा; महाविकास आघाडीत बिघाडीची चिन्हे मुंबई : जलसंपदा मंत्री

Nepal Floods Impact on Bihar and UP : नेपाळच्या पुराचा बिहार-उत्तर प्रदेशालाही धोका; ७ जिल्ह्यांना अलर्ट, पुढील ४८ तास महत्त्वाचे

पाटणा : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराचा परिणाम आता भारतातील सीमावर्ती राज्यांवरही होण्याची शक्यता आहे.

Jalgaon : ११ हजार किमीच्या सात रेल्वे मार्गांचे लवकरच चौपदरीकरण, मुंबई-हावडा मार्गाचा समावेश

Jalgaon : देशातील अतिवर्दळीच्या रेल्वे मार्गांवरील वाढता प्रवासी आणि मालवाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी भारतीय

Dating App Gang : 'नको तेच केलं!' डेटिंग ॲपवरून तरुणाला जाळ्यात ओढले अन्...; जयपूरमध्ये ‘गे डेटिंग ॲप गँग’चा पर्दाफाश

जयपूर : गे डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून तरुणांशी मैत्री करून त्यांना भेटण्यासाठी बोलावायचे आणि त्यानंतर हल्ला