Dating App Gang : 'नको तेच केलं!' डेटिंग ॲपवरून तरुणाला जाळ्यात ओढले अन्...; जयपूरमध्ये ‘गे डेटिंग ॲप गँग’चा पर्दाफाश

जयपूर : गे डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून तरुणांशी मैत्री करून त्यांना भेटण्यासाठी बोलावायचे आणि त्यानंतर हल्ला करून ब्लॅकमेल करत पैसे उकळायचे, असा आरोप असलेल्या टोळीचा जयपूर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणात करधनी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून, गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त करण्यात आली आहे.


पोलिसांकडे गे डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून तरुणांना लक्ष्य करून त्यांच्याकडून पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर जयपूर पश्चिम पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपासासाठी पथक तयार केले. आरोपी कथितपणे डेटिंग ॲपवर तरुणांशी संपर्क साधायचे. काही काळ चॅटिंग करून मैत्री वाढवल्यानंतर त्यांना तुलनेने निर्जन ठिकाणी भेटण्यासाठी बोलावले जात असल्याचा आरोप आहे.



बोलवायचे आणि नंतर...


पीडित व्यक्ती भेटण्यासाठी आल्यानंतर त्याच्यावर हल्ला करून धमकावले जात असल्याची माहिती तपासात समोर आली. त्यानंतर संबंधित व्यक्तीला ब्लॅकमेल करून पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप आहे.


तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे संशयितांचा माग काढला. त्यानंतर करधनी पोलिसांनी अनिल रुलानिया आणि मदन नेहरा या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरल्याचा संशय असलेली कारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.


आता पोलिसांकडून आरोपींची चौकशी सुरू असून, त्यांनी आतापर्यंत किती जणांना लक्ष्य केले, याचा शोध घेतला जात आहे. तसेच या प्रकरणात आणखी किती जणांचा सहभाग आहे आणि हे जाळे जयपूरबाहेरही पसरले आहे का, याची माहिती पोलीस घेत आहेत.


दोन्ही आरोपींच्या चौकशीतून या कथित टोळीच्या कामाची पद्धत आणि इतर संभाव्य गुन्ह्यांची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे.


Comments
Add Comment

Nepal Floods Impact on Bihar and UP : नेपाळच्या पुराचा बिहार-उत्तर प्रदेशालाही धोका; ७ जिल्ह्यांना अलर्ट, पुढील ४८ तास महत्त्वाचे

पाटणा : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराचा परिणाम आता भारतातील सीमावर्ती राज्यांवरही होण्याची शक्यता आहे.

Gandak River : गंडक नदीची पाणीपातळी घटली; बिहारवरील पुराचा धोका टळला

नेपाळ आणि बिहारमधील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गंडक म्हणजेच नारायणी नदीची पाणीपातळी वेगाने कमी होत

Nepal's flood situation : नेपाळमधील पूरस्थितीवर पंतप्रधान मोदींची बालेन्द्र शाह यांच्याशी चर्चा, भारताकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

नवी दिल्ली : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

UP : उत्तरप्रदेशमध्ये आई-वडिलांशी दुर्व्यवहार करणारी मुले संपत्तीतून बेदखल होणार

लखनऊ : उत्तर प्रदेश (UP) सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे

DRDO Military Combat Parachute System test : लडाखमध्ये २२,००० फूट उंचीवरून स्वदेशी लष्करी लढाऊ पॅराशूट प्रणालीची चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने लडाखमधील जगातील सर्वात उंच ड्रॉप झोनपैकी एकावर आपल्या लष्करी लढाऊ पॅराशूट प्रणालीची

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी 27 ऑगस्ट रोजी 'खेलो इंडिया संवाद'मध्ये तरुणांना करणार संबोधित

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 'खेलो इंडिया