पुणे : ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या वेबसाइट्सवर झालेल्या कथित सायबर हल्ल्याच्या तपासाची व्याप्ती आता पुणे जिल्ह्यातील जुन्नरपर्यंत पोहोचली आहे. जुन्नरमधील तांदूळ बाजार परिसरातील दोन जणांना संशयास्पद मनी ट्रान्सफर व्यवहारांच्या चौकशीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या प्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे स्थानिक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या कालावधीत केंद्र सरकारच्या ५४ महत्त्वाच्या वेबसाइट्सवर DDoS सायबर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा तपास NIAकडून सुरू आहे. तपासाचा भाग म्हणून २४ ऑगस्ट रोजी जुन्नरसह देशातील पाच ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली. (NIA Raid)
मुंबई : मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने मोठी कारवाई करत ३०२ ग्रॅम हेरॉईन जप्त केले आहे. या हेरॉईनची बाजारातील किंमत सुमारे ३.५० कोटी रुपये ...
दोघांवर संशय
या कारवाईदरम्यान जुन्नरच्या तांदूळ बाजार परिसरातील दोन स्थानिक रहिवाशांना कथित संशयास्पद मनी ट्रान्सफर व्यवहारांबाबत चौकशीसाठी तपास यंत्रणेने सोबत नेल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या दोघांविरोधात जुन्नर पोलीस ठाण्यात सध्या कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
लॅपटॉप, मोबाईलसह डिजिटल साहित्य जप्त
NIAच्या संयुक्त कारवाईत एकूण तीन लॅपटॉप, पाच मोबाईल फोन आणि इतर डिजिटल साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, यापैकी नेमके कोणते साहित्य जुन्नरमधून जप्त करण्यात आले, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. (Pune News)
त्यामुळे ताब्यात घेतलेल्या दोघांचा कथित सायबर हल्ल्याशी नेमका काय संबंध आहे, तसेच संशयास्पद मनी ट्रान्सफर व्यवहारांचा या प्रकरणाशी काय संबंध आहे, हे NIAच्या पुढील तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. (Cyber Security Alert)






