Nashik : पिंपळगाव बसवंतला होणार वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

Nashik : आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. आजच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मुख्यमंत्री सचिवालयातील जनसंपर्क कक्षाकडून मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले. या बैठकीत क्रीडा, उच्च व तंत्रशिक्षण, महसूल तसेच विधी व न्याय विभागाशी संबंधित विविध प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. नाशिकच्या दृष्टीने महत्वाचे म्हणजे यात नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तरास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे पिंपळगावकरांचा नाशिकला येणाचा प्रवास वाचणार आहे.



मंत्रिमंडळ निर्णय खालीलप्रमाणे


क्रीडा विभाग - आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या राज्यातील खेळाडू व त्यांचे क्रीडा मार्गदर्शक यांना दिल्या जाणाऱ्या रोख बक्षिस धोरणात सुधारणा


उच्च व तंत्रशिक्षण विभाग - नागपूर येथे लता मंगशेकर विद्यापीठ स्थापन होणार. तसेच अहिल्यानगर येथे डॉ. बाळासाहेब विखे पाटील विद्यापीठ . या खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठात वैद्यकशास्त्र, दंतवैद्यक, फिजिओथेरपी आणि नर्सिंग विद्याशाखांमधील पदवी, पदव्युत्तर आणि सुपर स्पेशॅलिटी अभ्यासक्रम सुरु होणार.


महसूल व वन विभाग - जत नगरपरिषदेला प्रशासकीय इमारत उभारणीसाठी मौजे जत (जि. सांगली) येथील २ हजार ५८५ चौ. मीटर शासकीय जमीन देण्यास मान्यता


विधि व न्याय - नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय होणार. त्यासाठीची पदे व अनुषांगिक खर्चाच्या तरतुदीस मान्यता.


या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह इतर मंत्री उपस्थित होते. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतून राज्याच्या विकासाला गती देणारे आणि विविध घटकांना दिलासा देणारे निर्णय घेण्यात आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

Comments
Add Comment

Nashik News : दिंडोरीत अन्न व औषध प्रशासनाकडून दणका ! नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदाराविरोधात दंडात्मक कारवाई

Nashik Dindori News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. नाशिक जिल्ह्यात देखील

Nashik : वनवासी बांधवांसोबत जुळणार दैवी बंधाची वीण, धनश्रीदीदींच्या उपस्थितीत शुक्रवारी चारोसे येथे रक्षाबंधन उत्सव

Nashik : भाऊ-बहिणीच्या निर्मळ प्रेमाला दैवी भ्रातृभावाची व्यापक जोड देणारा स्वाध्याय परिवाराचा विशेष ‘रक्षाबंधन

Dhule Crime News : 'त्या मुलीशी लग्न करू नका, माझे तिच्याशी प्रेमसंबंध'...घटनेचा जाब विचारल्याच्या रागातून दोघांवर जीवघेणा हल्ला

Dhule Crime News : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात एक संतापजनक घटना घडली आहे. साक्री तालुक्यातील रायपूर येथे फोन करून

Natural Skincare : रक्षाबंधनासाठी घरच्या घरी चेहऱ्यावर आणा नैसर्गिक ग्लो; बेसनाचा हा फेसपॅक ठरेल उपयोगी

रक्षाबंधनाच्या दिवशी चेहरा तजेलदार आणि फ्रेश दिसावा असं प्रत्येकालाच वाटतं. यासाठी महागड्या फेशियलसाठी

Nashik : ‘मिशन ग्रीन मान्सून’च्या नवव्या टप्प्यात सिन्नर औद्योगिक क्षेत्रात वृक्षारोपण

Nashik : उन्नत नाशिक अभियानांतर्गत नाशिक शहर व जिल्हा हरित करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन ग्रीन

Nashik Accident News : पिकअपची दुचाकीला भीषण धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

Nashik Accident News : नाशिकमध्ये एक हृदयद्रावक अपघाताची घटना समोर आली आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या २७