Nashik Dindori News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. नाशिक जिल्ह्यात देखील विविध ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. भेसळयुक्त पदार्थ विक्री करणारे तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकांविरोधात कारवाई करण्यात येत आहे. अशीच एक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई अन्न व औषध प्रशासनाकडून दिंडोरी येथे कारवाई करण्यात आली आहे. (Dindori FDA News)
New Delhi : 'तेहलका' मासिकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांच्याशी संबंधित २०१३ च्या बहुचर्चित बलात्कार प्रकरणाची सुनावणी सोमवारी २४ ऑगस्ट रोजी सर्वोच्च ...
मातेरेवाडीत पहिली धडक कारवाई
अन्न व औषध प्रशासनाने (FDA) दिंडोरी शहर आणि संपूर्ण तालुक्यामध्ये (Taluka) अन्न सुरक्षेबाबत व्यापक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या (Student) आरोग्याचे रक्षण करण्यासाठी शालेय परिसराच्या ५० मीटर अंतराच्या आत जंक फूड आणि असुरक्षित अन्नपदार्थांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रशासनाची कडक नजर असणार आहे. या मोहीम आणि नियमावलीअंतर्गत दिंडोरी तालुक्यातील (Didori Taluka) मातेरेवाडी येथील मविप्रच्या नूतन इंग्लिश स्कूल जवळील ‘ओम साई जनरल स्टोअर्स’ या दुकानावर पहिली धडक कारवाई करण्यात आली. नियम धाब्यावर बसवून विक्री करणाऱ्या या दुकानदाराला १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या स्टोअर्सचे संचालक विकास वाघ यांनी ऑनलाइन दंड भरला. (Dindori FDA News)
या कारवाईमुळे तालुक्यातील नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, प्रशासनाने सर्व आस्थापनांना नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन केले आहे.