Nashik Simhastha Kumbh Mela : नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. या कुंभमेळ्यात तब्बल १२ कोटी भाविक सहभागी होण्याचा अंदाज असून, त्यांच्या सोयीसाठी सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. तर मोठ्या प्रमाणात भाविकांची संख्या असल्याने पोलीस बंदोबस्त देखील मोठा लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने निवास व्यवस्थेचे नियोजन अंतिम टप्प्यात आणले आहे. विविध शासकीय कार्यालये, पोलिस आस्थापना, धर्मशाळा, ट्रस्टच्या इमारती तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये मिळून ३० हजार ३४० जणांच्या निवासाची क्षमता उपलब्ध करण्यात येणार आहे. यामध्ये ३ हजार २२८ अधिकारी-कर्मचारी, तर तब्बल २७ हजार ११२ अंमलदार व इतरांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. ( Simhastha Kumbh Mela)
https://prahaar.in/2026/08/24/if-i-get-a-chance-i-will-contest-elections-olympic-medalist-saina-nehwal-said/ श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या सत्रात मुसळधार पावसामुळे खेळ थांबण्यापूर्वी, ध्रुव जुरेल ...
30 हजारांहून अधिक पोलिसांच्या निवासाचे नियोजन
मोठ्या प्रमाणात भाविकांची संख्या असल्याने आणि कायदा सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त लागणार आहे. त्यामुळे सिंहस्थ काळात मोठ्या प्रमाणात पोलिस अधिकारी व अंमलदारांची नियुक्ती होणार आहे त्यामुळे त्यांच्या निवासाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मंगल कार्यालये, लॉज आणि धर्मशाळांमध्ये सर्वाधिक २१ हजार ६१४ जणांची निवास क्षमता उपलब्ध आहे. त्यापाठोपाठ नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या बॅरेकमध्ये २ हजार ३००, पोलिस मुख्यालयातील २४ बॅरेकमध्ये १ हजार ९२८, तर पोलिस ठाणे व शाखा रोड क्रमांक ५ येथे ६७८ जणांची व्यवस्था प्रस्तावित आहे. पांजरापोळ ट्रस्टच्या इमारतींमध्ये ५०० जणांची, तर इतर आवश्यक बांधकाम व दुरुस्तीच्या माध्यमातून ९२ जणांची निवास क्षमता उपलब्ध होणार आहे. इंद्रकुंड येथील मनपा इमारतीत अधिकारी वर्गासाठी ५०, आरोग्य विज्ञान विद्यापीठात ५०, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात १२०, महाराष्ट्र पोलिस अकादमीत १ हजार १४२, तर गुन्हे अन्वेषण विभागाच्या डीटीएस इमारतीमध्ये २०० अधिकाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. (Simhastha Kumbh Mela)
पुणे : पुणे आणि आसपासच्या परिसरात स्वतःचे घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी म्हाडाच्या पुणे मंडळाने एक अत्यंत दिलासादायक बातमी आणली आहे. म्हाडाने ...
पोलिसांच्या निवासाची व्यवस्था कार्यक्षेत्राजवळ करण्यावर भर
गर्दीचे नियोजन, वाहतूक नियंत्रण, महत्त्वाच्या धार्मिक स्थळांची सुरक्षा, मिरवणुका व स्नानपर्व काळात बंदोबस्त यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे अधिकारी व अंमलदारांच्या निवासाची व्यवस्था त्यांच्या कार्यक्षेत्राजवळ करण्यावर भर देण्यात येत आहे. निवासाची व्यवस्था योग्य झाल्यास, बंदोबस्तासाठी नियुक्त पोलिसांना वेळेत संबंधित ठिकाणी पोहोचणे शक्य होणार असून, आपत्कालीन परिस्थितीत अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देणेही सुलभ होणार आहे. गर्दीच्या ठिकाणी संभाव्य अनुचित प्रकारांना आळा घालणे, हरवलेल्या व्यक्तींचा शोध, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे, संवेदनशील भागात गस्त वाढविणे, यासाठी उपलब्ध मनुष्यबळाचा वापर करता येणार आहे.