Raksha Bandhan : जाणून घ्या रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी बांधण्याची शुभ वेळ ?

मुंबई : यंदा शुक्रवार २८ ऑगस्ट २०२६ रोजी रक्षाबंधन आहे. याच दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण आहे आणि पौर्णिमा समाप्ती सकाळी नऊ वाजून ४७ मिनिटांनी आहे. यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी बांधण्याची शुभ वेळ कोणती यावरून अनेकांचा संभ्रम आहे. राखी सकाळी नऊ वाजून ४७ मिनिटांपर्यंतच बांधता येणार का ? नंतर राखी बांधता येणार नाही का ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या पार्श्वभूमीवर पंचागकर्त्यांनी मार्गदर्शन केले आहे.



यंदा गुरुवार २७ ऑगस्ट २०२६ रोजी नारळी पौर्णिमा अर्थात श्रावण पौर्णिमा आहे. याच दिवशी सकाळी नऊ वाजून आठ मिनिटांनी पौर्णिमेचा प्रारंभ होत आहे. रक्षाबंधन शुक्रवार २८ ऑगस्ट २०२६ रोजी आहे आणि याच दिवशी पौर्णिमा समाप्ती सकाळी नऊ वाजून ४७ मिनिटांनी आहे. खंडग्रास चंद्रग्रहण असले तरी ते भारतातून दिसणार नाही. यामुळे ग्रहणाचे वेधादि नियम भारतात पाळण्याची आवश्यकता नाही, असे पंचागकर्त्यांचे म्हणणे आहे. जर आपल्या घरात श्रावण पौर्णिमा या तिथीच्या उदयाच्या दिवशी राखी बांधण्याची प्रथा असेल तर गुरुवारी आणि रक्षाबंधनाच्याच दिवशी राखी बांधण्याची प्रथा असेल तर शुक्रवारी राखी बांधता येईल.



या वर्षी गुरुवार २७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी नऊ वाजून आठ मिनिटांपासून ते शुक्रवार २८ ऑगस्ट २०२६ रोजी सूर्यास्तापर्यंत कधीही राखी बांधता येईल. भावाला राखी बांधण्यासाठी रक्षाबंधनाचा दिवस शुभ आहे. त्यामुळे शुक्रवारी दिवसभरात भावाला राखी बांधता येईल, असे पंचागकर्त्यांचे म्हणणे आहे.


Comments
Add Comment

Weather Update : महाराष्ट्रात सोमवारी कोण कोणत्या भागात पावसाची शक्यता ?

मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार २४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

AK-203 Sher Rifle : संरक्षण उत्पादनात भारताची झेप; स्वदेशी AK-203 रायफलची यशस्वी निर्मिती

नवी दिल्ली : स्वदेशी संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ‘मेक इन इंडिया’

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; पहिल्या डबल-स्टॅक लाँग-हॉल कंटेनर ट्रेनची यशस्वी धाव

मुंबई : भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) येथून

CM Devendra Fadnavis : मुंबईत ‘भुलेश्वरचा राजा’च्या आगमन मिरवणुकीत घडलेल्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी केला शोक व्यक्त

मुंबई : मुंबईतील भुलेश्वर परिसरात ‘भुलेश्वरचा राजा’ गणेशमूर्तीच्या आगमन मिरवणुकीदरम्यान शनिवारी (दि. २२ ऑगस्ट)

Mumbai-Ahmedabad Bullet Train : भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनसाठी १६ चालकांची नियुक्ती; जपानमध्ये वर्षभर विशेष प्रशिक्षण

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या संचालनासाठी मनुष्यबळाची तयारी वेगाने सुरू झाली आहे. नॅशनल

US Military Casualties : इराणविरुद्धच्या युद्धात १८ सैनिकांचा मृत्यू आणि ७५६ जवान जखमी, अमेरिकेने दिली माहिती

वॉशिंग्टन डीसी : इराण विरुद्धच्या युद्धात सहा महिन्यांत १८ सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच या युद्धात ७५६ जवान