Mumbai : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी येत्या रविवारी, दिनांक २३ ऑगस्ट २०२६ रोजी उपनगरीय मार्गांवर मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. रुळांची दुरुस्ती आणि पायाभूत सुविधांच्या सुरक्षेसाठी हा ब्लॉक घेण्यात येत असून, यामुळे मुख्य मार्ग (मेन लाईन) आणि हार्बर लाईनवरील लोकल सेवांवर परिणाम होणार आहे.
Mumbai : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून दिवा स्थानकावर पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षेसाठी विशेष पादचारी पुलाचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. ...
कुठे आणि किती वेळ असणार ब्लॉक?
-
मेन लाईन: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते विद्याविहार दरम्यान 'अप' आणि 'डाऊन' धीम्या मार्गावर सकाळी १०:५५ ते दुपारी ३:५५ वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल.
-
हार्बर लाईन: कुर्ला ते वाशी दरम्यान 'अप' आणि 'डाऊन' मार्गावर सकाळी ११:१० ते सायंकाळी ४:१० वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाईल.
प्रख्यात वकील आणि काँग्रेस नेते डॉ. अभिषेक मनु सिंघवी यांच्या मालकीची एक अतिशय आलिशान कार सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय ठरली आहे. सिंघवी ...
लोकल ट्रेनच्या प्रवाहात होणारे बदल:
-
मेन लाईनवरील बदल: CSMT मधून सकाळी १०:४८ ते दुपारी ३:४५ दरम्यान सुटणाऱ्या 'डाऊन' धीम्या मार्गावरील गाड्या सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान 'डाऊन' जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबून पुन्हा विद्याविहार येथे धीम्या मार्गावर आणल्या जातील. तसेच घाटकोपरहून सकाळी १०:१९ ते दुपारी ३:५२ दरम्यान सुटणाऱ्या 'अप' धीम्या गाड्या विद्याविहार ते सीएसएमटी दरम्यान जलद मार्गावरून धावतील आणि ठराविक स्थानकांवर थांबतील.
-
हार्बर लाईनवरील बदल: CSMT वरून सकाळी १०:३४ ते दुपारी ३:३६ दरम्यान वाशी, बेलापूर आणि पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर सेवा तसेच पनवेल, बेलापूर आणि वाशी येथून सुटणाऱ्या अप हार्बर सेवा या कालावधीत बंद राहतील. प्रवाशांच्या सोयीसाठी ब्लॉकच्या काळात सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल-वाशी दरम्यान विशेष लोकल सेवा चालवल्या जातील. तसेच प्रवाशांना ठाणे-वाशी आणि नेरुळ स्थानकांद्वारे प्रवास करण्याची मुभा असेल.
प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊनच घराबाहेर पडावे आणि रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.





