Saturday, August 22, 2026

Nashik : सिन्नर तालुक्यातील पिंपळगाव कडवा कॅनलजवळ भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू

Nashik : सिन्नर तालुक्यातील पिंपळगाव कडवा कॅनलजवळ भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू

Nashik : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. पांचाळे–सोमठाणे रस्त्यावर पिंपळगाव कडवा कॅनलजवळ आज पहाटे सुमारे ६ वाजेच्या सुमारास टाटा मॅजिक वाहनाचा भीषण अपघात झाला. अपघातग्रस्त वाहनाचा क्रमांक MH 20 BC 7264 असा आहे. दरम्यान, या भीषण अपघातात वाहनचालक अलीम आदम सहा (वय ३०, रा. मालेगाव) यांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले असून, तीन जण सुखरूप असल्याचे समजते. (Sinnar Accident News)

तीन दिवसांत नऊ अपघात

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पांचाळे–सोमठाणे रस्त्यावर गेल्या तीन दिवसांत तब्बल नऊ अपघाती घटना घडल्याचा दावा स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. (Sinnar Accident News)

या रस्त्यावर अद्याप आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर, रिफ्लेक्टर, दिशादर्शक फलक तसेच रात्रीच्या वेळी वाहनचालकांना मार्ग स्पष्ट दिसण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्यामुळे भविष्यात आणखी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची मागणी होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >