Mumbai : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून दिवा स्थानकावर पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षेसाठी विशेष पादचारी पुलाचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. दिवा स्थानकावरील किमी ४२/१२८-१३० येथे 'कल्याण दिशेकडील' पादचारी पुलाच्या बांधकामासाठी येत्या काही दिवसांत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
प्रख्यात वकील आणि काँग्रेस नेते डॉ. अभिषेक मनु सिंघवी यांच्या मालकीची एक अतिशय आलिशान कार सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय ठरली आहे. सिंघवी ...
ब्लॉकचा कालावधी आणि विभाग:
हा विशेष ब्लॉक दिवा स्थानकावर कळवा ते डोंबिवली दरम्यान 'अप' आणि 'डाऊन' धीम्या मार्गावर रात्रीच्या वेळी घेतला जाणार आहे. खालील तीन दिवशी हा ब्लॉक असेल:
-
दिनांक २१/२२.०८.२०२६ (शुक्रवार/शनिवारची रात्र)
-
दिनांक २२/२३.०८.२०२६ (शनिवार/रविवारची रात्र)
-
दिनांक २३/२४.०८.२०२६ (रविवार/सोमवारची रात्र)
- वेळ: रात्री ०१:२० ते पहाटे ०३:२० वाजेपर्यंत (एकूण २ तास)
बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची दीर्घकाळाची जोडीदार गॅब्रिएला डेमेट्रियाडेस यांनी अखेर अधिकृतपणे विवाह केला आहे. 'इंडिया टुडे'च्या ...
उपनगरीय लोकल सेवांच्या मार्गात बदल:
या ब्लॉकमुळे काही उपनगरीय गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे:
-
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून रात्री ००:०८ वाजता कसारासाठी सुटणारी आणि ००:१२ वाजता कर्जतसाठी सुटणारी लोकल गाडी ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान 'डाऊन' जलद मार्गावरून वळवली जाईल.
-
या दोन्ही उपनगरीय गाड्या ठाकुर्ली आणि कोपर स्थानकांवर थांबणार नाहीत, याची प्रवाशांनी नोंद घ्यावी.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि रेल्वेच्या पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासाठी हा देखभाल ब्लॉक आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. या ब्लॉकमुळे प्रवाशांची होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.






