Nashik Crime News : धारदार शस्त्राने वार करून २९ वर्षीय तरुणाचा खून, दारू पिऊन पडल्याचा बनाव रचला अन्...

Nashik Crime News : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. मजुरीचे पैसे दिले नाहीत या रागातून एका २९ वर्षीय तरुणाच्या डोक्यात धारदार हत्याराने वार करून त्याचा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना दिंडोरी तालुक्यातील गोळशी येथे घडली असून योगेश रघुनाथ लहांगे (Yogesh Raghunath Lahange) (वय २९, रा. गोळशी) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात (Dindori Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या प्रकरणात दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. (Nashik Crime News)



नेमकं काय घडलं ?


​फिर्यादी अशोक रघुनाथ लहांगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हा संपूर्ण घटनाक्रम १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता घडला. मजुरीच्या पैशांच्या देण्याघेण्यावरून हा वाद निर्माण झाला, यावरून संशयित आरोपी अशोक म्हसु गायकवाड (वय ४२, रा. गोळशी) आणि किशोर हरी गांगोडे (वय ४४, रा. फोपळवाडे) यांनी संगणमत करून योगेशच्या डोक्यात धारदार हत्याराने तीन जबर वार केले. धक्कादायक म्हणजे ​घटनेनंतर आरोपी किशोर याने योगेश दारू पिऊन पडल्याचा बनाव रचला. मात्र, कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली असता योगेश गंभीर जखमी अवस्थेत आढळला. त्यास तातडीने उमराळे आरोग्य केंद्रात आणि नंतर आडगाव मेडिकल कॉलेज (Adgaon Medical College) येथे दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. (Nashik Crime News)



दोन संशयितांना अटक


पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच ​पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राखोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद पवार, अल्ताफ शेख, हरिश्चंद्र पाडवी, प्रदीप शिंदे व पथक या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत,


Comments
Add Comment

Alaska Plane Crash : अँकरेजवरून उडालेले सेसना चार्टर विमान दुर्गम भागात कोसळले; २ वैमानिकांसह ८ प्रवासींचा मृत्यू

अमेरिकेतील अलास्का प्रांतातील अत्यंत कठीण आणि बर्फाच्छादित परिसरात एक भीषण विमान दुर्घटना घडली आहे. टेड

Kangana Ranaut vs Sharmila Tagore : 'वंदे मातरम' वादावर खासदार कंगना रणौतची शर्मिला टागोर यांच्यावर टीका : "कलेला धर्मात अडकवू नका"

राष्ट्रगीत 'वंदे मातरम'बद्दल ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर (Sharmila Tagore) यांनी केलेल्या वक्तव्यावर अभिनेत्री आणि

Maha Walkathon : महा वॉकेथॉनमधून जलसंपन्न महाराष्ट्राचा संदेश; राज्यभरात 3 लाखांहून अधिक नागरिकांचा सहभाग

मुंबई : माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक (Sudhakarrao Naik) यांच्या जलसंधारणाच्या कार्याची आठवण ठेवत 21 ऑगस्ट हा दिवस

Shweta Tiwari on Raj Thackeray : "मराठी माणसाचं हे वर्तन मान्य आहे का?" श्वेता तिवारीचा राज ठाकरेंना थेट परखड सवाल

टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) हिला सोशल मीडियावर अत्यंत अपमानास्पद कमेंट्स आणि अश्लील

Hinjewadi Metro : पुणेकरांसाठी मोठी बातमी! माण-बालेवाडी मेट्रोला सुरक्षा मंजुरी; उद्घाटनाअभावी सेवा रखडली

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील (Pune) प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. हिंजवडी आयटी पार्कला जोडणाऱ्या

Gold Silver Rate Today : बाईई...सोन्या-चांदीचा भडका! २४ तासांत दर उच्चांकी पातळीवर; पाहा आजचे ताजे भाव!

जळगाव : जळगावच्या (Jalgoan) स्थानिक सराफा बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी दरवाढ नोंदवली गेली. गेल्या २४ तासांत