Friday, August 21, 2026

Ahilyanagar Crime : घरासमोर लावली गांजाची झाडे, 64.73 किलो वजनाचा गांजा जप्त

Ahilyanagar Crime : घरासमोर लावली गांजाची झाडे, 64.73 किलो वजनाचा गांजा जप्त

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर तालुक्यातील धनगरवाडी (Dhangarwadi) येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धनगरवाडी येथे चक्क घरासमोर अवैधरित्या गांजाची झाडे लावण्यात आली होती. एमआयडीसी पोलिसांनी (MIDC Police) या गांजा लागवड करणार्‍या व्यक्तीविरूध्द कारवाई केली असून या कारवाईत तीन लाख 23 हजार 650 रूपये किमतीचा 64.73 किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. तर याप्रकरणी अनिल लक्ष्मण विरकर (वय 49, रा. धनगरवाडी) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Ahilyanagar Crime News)

नेमकं प्रकरण काय ?

अहिल्यानगर तालुक्यातील धनगरवाडी येथे एका व्यक्तीने घरासमोर गांजाची झाडे लावल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी या प्रकरणात कारवाईचे आदेश दिले. पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने, प्रभारी सहाय्यक निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिसांचे पथक धनगरवाडी येथे रवाना झाले. पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एका घरासमोर गांजाची झाडे लावल्याचे आढळून आले. (Ahilyanagar Crime News)

64.73 किलो वजनाचा गांजा जप्त 

पोलिसांनी या प्रकरणात कारवाई केली असून तीन लाख 23 हजार 650 रूपये किमतीचा 64.73 किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे तर त्याठिकाणी राहत असलेल्या अनिल लक्ष्मण विरकर (वय 49, रा. धनगरवाडी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घरासमोर अवैधरित्या लागवड केलेली गांजाची झाडे पोलिसांनी ताब्यात घेतलीय. ही कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे, पोलीस उपनिरीक्षक अजय कौटे, अंमलदार सुदाम लोंढे, सुशांत दिवटे, सचिन हरदास, उमेश शेरकर, सुरज देशमुख आणि अक्षय रोहोकले या पथकाने केली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >