Mumbai News : 'बर्गर खाताना अचानक दाताखाली काच आली अन्...'; मुंबईतील नामवंत 'जिमिज बर्गर'चा भयंकर निष्काळजीपणा उघड

मुंबई : मुंबईतील अंधेरी परिसरातील प्रसिद्ध जिमिज बर्गर या हॉटेलमध्ये खाद्यपदार्थाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रकार समोर आला आहे. हॉटेलमध्ये मागवलेल्या कोरियन व्हेजी बर्गरमध्ये (Veg Burger) काचेचा तुकडा आढळल्याची तक्रार करण्यात आली आहे. या घटनेनंतर ग्राहकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) तसेच आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, तनिषा गोगरी ही तरुणी 16 ऑगस्ट रोजी आपल्या मैत्रिणीसोबत अंधेरीतील जिमिज बर्गर येथे गेली होती. दोघींनी काही खाद्यपदार्थांची ऑर्डर दिली. यामध्ये नाचो बन आणि कोरियन व्हेजी बर्गरचा समावेश होता. बर्गर खात असताना तनिषाला त्यामध्ये अचानक काचेचा तुकडा असल्याचे लक्षात आले. (Mumbai News)



काचेचा तुकडा लक्षात येताच तरुणीने तातडीने हा प्रकार आपल्या मैत्रिणीला आणि हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना सांगितला. सुदैवाने काचेचा तुकडा घशात अडकला नाही किंवा त्यामुळे कोणतीही मोठी दुखापत झाली नाही. मात्र, तो तुकडा चुकून गिळला गेला असता किंवा तोंडाला लागला असता गंभीर इजा होण्याची शक्यता होती. (FDA)


घटनेनंतर तरुणी आणि तिच्या मैत्रिणीने हॉटेल व्यवस्थापनाला याबाबत माहिती दिली. मात्र, तक्रारीनुसार हॉटेल कर्मचाऱ्यांनी बर्गरमधील काचेचा तुकडा जतन करण्याऐवजी तो फेकून दिला. या प्रकारामुळे ग्राहकाच्या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली.


यानंतर तनिषाच्या वडिलांनी याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन आणि आंबोली पोलिसांकडे तक्रार दाखल केली. खाद्यपदार्थात काचेचा तुकडा कसा आला, तसेच तक्रार केल्यानंतर हॉटेल व्यवस्थापनाने पुरावा का जतन केला नाही, याबाबत आता संबंधित यंत्रणांकडून तपास केला जाण्याची शक्यता आहे. (Food Safety)


प्रसिद्ध हॉटेलमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे खाद्यपदार्थ तयार करताना स्वच्छता आणि सुरक्षिततेचे नियम किती काटेकोरपणे पाळले जातात, यावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने या प्रकरणात प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे. (Food Complaint)


Comments
Add Comment

Mumbai News : मालवणीत घराचा भाग अचानक कोसळला; बचावकार्य सुरु

मुंबई: मुंबईतील मालाड पश्चिम परिसरात गुरुवारी, 20 ऑगस्ट रोजी सकाळी तळमजला अधिक एक मजली घर अचानक कोसळल्याची घटना

Cab Driver Viral Video : OTP वरून कॅब चालक-पॅसेंजरमध्ये वाद; मराठीत OTP सांगताच चालक भडकला, व्हिडीओ व्हायरल

मुंबई : महाराष्ट्रात मराठी भाषेच्या वापरावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. मुंबईतील एका मराठी प्रवाशाचा

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुढील २४ तासांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा; गारपिटीचीही शक्यता

मुंबई : राज्यात सध्या काही भागांत पावसाची हजेरी सुरू असली, तरी अनेक जिल्ह्यांमध्ये अद्याप दमदार पावसाची

Free School Bag : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर; राज्य सरकारकडून १७४ कोटींच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीत शिक्षण घेणाऱ्या

Western Railway Food and Water Safety : पश्चिम रेल्वेची अन्न आणि पाणी सुरक्षेसाठी कडक तपासणी; 98 टक्के अन्न नमुने, तर 99.87 टक्के पाणी नमुने सुरक्षित

मुंबई : प्रवाशांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न तसेच स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पश्चिम रेल्वेने

Mumbai Port Global Partnership : मुंबईच्या सागरी विकासाला वेग; क्रूझ पर्यटनापासून जहाजबांधणीपर्यंत जागतिक गुंतवणुकीच्या संधी

मुंबई : मुंबई बंदर प्राधिकरणाने (MbPA) व्यापार, पर्यटन आणि बंदराधारित विकासाला नवी दिशा देत क्रूझ पर्यटन, मरिना