पक्षाकडून प्रत्येक विषय दिला जाईल आणि त्यावर कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करायचे आहे, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट इशारा दिला. आगामी राजकीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवर बूथ पातळीवर संघटन मजबूत करण्याबरोबरच कार्यकर्त्यांनी आक्रमक, नियोजनबद्ध आणि जबाबदारीने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय जनता पक्षाच्या मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र विभागातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक बुधवारी नाशिकमधील पंचवटी येथील स्वामीनारायण बँक्वेट हॉलमध्ये झाली. या बैठकीत मार्गदर्शन करताना रवींद्र चव्हाण बोलत होते .(Nashik News)
Nashik Crime News : कंपनीच्या कामानिमित्त मित्रासोबत वाडीवऱ्हे परिसरात (Wadivarhe area) गेलेल्या सिडकोतील ३४ वर्षीय महिलेचा अपघातात मृत्यू झाला होता. मंगळवारी दुपारी दोन ...
‘एक व्यक्ती, एक बूथ’
एसआयआर प्रक्रियेत आपण नेमके कुठे कमी पडतो आहोत, हे ओळखून त्यावर तातडीने काम करण्याची गरज आहे. निवडणूक जिंकण्यासाठी केवळ नेत्यांचे नियोजन किंवा मोठ्या सभा पुरेशा नसून प्रत्यक्ष बूथवर कार्यकर्त्यांची मजबूत यंत्रणा असणे अत्यावश्यक आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.नाशिकमधील २५६ बूथवर ‘एक व्यक्ती, एक बूथ’ या पद्धतीने काम करण्याचे प्रयत्न करण्यात आले असून, ९४ बीएलएची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, काही बूथवर अद्याप संघटनात्मक कामकाज अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्येक बूथवर जबाबदार कार्यकर्ता, मतदारांशी सातत्यपूर्ण संपर्क आणि निवडणुकीच्या दिवशी प्रभावी यंत्रणा उभी करण्यावर त्यांनी भर दिला. (Nashik News)
Nashik FDA Raid : नाशिकमध्ये एफडीएकडून कारवाईचे सत्र सुरु आहे. खाद्य पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्या, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेलवर नाशिकमध्ये एफडीएकडून ...
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात संघटनात्मक ताकद वाढविणार
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील पक्ष संघटना अधिक सक्षम, गतिमान आणि प्रभावी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. आगामी राजकीय व संघटनात्मक कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग आणि बूथ स्तरापासून संघटन मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला. नाशिकमधील या बैठकीतून आगामी राजकीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कार्यकर्त्यांना स्पष्ट दिशा देण्यात आली असून, निवडणुकीच्या तयारीत बूथ पातळीवरील संघटन हाच पक्षाचा प्रमुख केंद्रबिंदू राहणार असल्याचे संकेत देण्यात आले.






