आर्थिक अडचणींमुळे शैक्षणिक 'गळती' रोखण्याचा उद्देश
मुंबई : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी राज्य सरकारकडून एक दिलासादायक उपक्रम राबवण्याचा विचार सुरू आहे. मुलींना उच्च शिक्षण घेताना आर्थिक मदत मिळावी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा, या उद्देशाने 'कमवा आणि शिका' या योजनेच्या धर्तीवर दरमहा दोन हजार रुपये पॉकेटमनी देण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे प्रयत्न सुरू असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली आहे.
नवी दिल्ली : कॅनडाच्या पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक मॉन्टी देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. १ मे २०२६ रोजी त्यांची दुसऱ्यांदा ...
मुंबईत आयोजित एका संवादादरम्यान त्यांनी या प्रस्तावित योजनेबाबत भाष्य केले. राज्यातील अनेक मुलींना आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षणात अडचणी येतात किंवा शिक्षण सोडावे लागते. अशा विद्यार्थिनींना शिक्षणासोबतच स्वतःच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी काही आर्थिक आधार मिळावा, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. सुमारे १२ लाख विद्यार्थिनींना या प्रस्तावित उपक्रमाचा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या हा प्रस्ताव प्राथमिक स्वरूपात असून, याबाबत अद्याप कोणतीही अंतिम घोषणा झालेली नाही. ही योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी विद्यापीठे आणि मोठ्या महाविद्यालयांशी चर्चा करण्याचे नियोजन सरकार करत आहे. तसेच, कंपन्यांच्या 'सीएसआर' निधीच्या माध्यमातून विद्यार्थिनींना दरमहा ही आर्थिक मदत उपलब्ध करून देता येईल का, याबाबतही चाचपणी केली जात आहे.






