Nashik : नाशिकच्या शिवाजीनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. शिवाजीनगर परिसरात पिठाच्या गिरणीत दळण दळत असताना एका व्यक्तीचा हात मशीनमध्ये अडकल्याची घटना घडली. या घटनेत सोमनाथ तुकाराम दहाले (Somnath Tukaram Dahale) हे जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अधिक उपचार सुरु आहे. (Nashik News)
National Sports Awards 2025 : केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाने जाहीर केलेल्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५ मध्ये महाराष्ट्राने उल्लेखनीय अशी ...
हात बाहेर काढण्यासाठी ग्राइंडर मशीन अन्...
नाशिकच्या शिवाजीनगर परिसरात सोमनाथ तुकाराम दहाले, (रा. फ्लॅट क्रमांक १७, कृष्णा डेअरी, शिवाजीनगर, सातपूर) यांचा हात पिठाच्या गिरणीत दळण दळत असताना अडकला. पिठाच्या गिरणीतील मशीनमध्ये हात अडकल्याने परिसरातील नागरिकांनी तातडीने सातपूर अग्निशामक केंद्राला याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सातपूर अग्निशामक दलाचे (Satpur Fire Brigade) जवान घटनास्थळी दाखल झाले. मशीनमध्ये अडकलेला हात बाहेर काढण्यासाठी ग्राइंडर मशीन तसेच कटवणी पार यांच्या सहाय्याने शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. (Nashik News)
Nashik News : कंपनीच्या कामानिमित्त मित्रासोबत वाडीवऱ्हे परिसरात (Wadivarhe area) गेलेल्या सिडकोतील ३४ वर्षीय महिलेला मृत्यूनं गाठलंय. मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या ...
सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
अखेर अथक प्रयत्नांनंतर सोमनाथ दहाले यांचा हात मशीनमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात अग्निशामक दलाला यश आले. त्यानंतर तेथील नागरिकांनी जखमी सोमनाथ दहाले यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या बचावकार्यात सातपूर अग्निशामक केंद्राचे लीडिंग फायरमन यू. आर. झिटे, वाहनचालक एम. एम. खांडेकर तसेच फायरमन शुभम लाड, ऋषिकेश पवार आणि उमेश गावित यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. वेळीच मदत मिळाल्याने मशीनमध्ये अडकलेल्या व्यक्तीची मोठी दुर्घटना टळली असून अग्निशामक दलाच्या तत्परतेचे परिसरातून कौतुक होत आहे.






