- महापालिका प्रशासनाने सभागृहात दिली ग्वाही
- भटके कुत्रे आणि त्यांच्या हल्ल्यामुळे प्रतिबंधित रेबीज उपलब्ध होत नसल्याने सभागृहात चर्चा
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या १४७ दवाखान्यांमार्फत मुंबईतील नागरिकांना भटक्या श्वानांनी चावा घेतल्यानंतर मोफत रेबीज लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मात्र, यापुढे रेबीज लस नाही म्हणून कुणीही रुग्ण परत नाही नाही,असे प्रशासनाने स्पष्ट केले. दरम्यान, डिसेंबर २०२५ ते मे २०२६ या कालावधीत १२,०७८ भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण आणि ३०,०५५ भटक्या कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने सभागृहात दिली. (Rabies Injections)
- स्थायी समितीनंतर महापालिका सभागृहातही प्रस्तावाला मंजुरी मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत अनेक विकासकांनी मंजुर आराखड्याची पुतर्ता न करता बांधकाम ...
मुंबई महापालिका सभागृहात नामनिर्देशित नगरसेवक कैलाशनाथ लालमणी पाठक यांनी ६६ ब अन्वये चर्चा घडवून आणत भटके कुत्रे आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून चावा घेतलेल्या व्यक्तीला दिल्या जाणाऱ्या लसींची संख्या कमी पडत आहे. परिणामी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयात रेबीज प्रतिबंधक लस व आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. यावर झालेल्या चर्चेत डॉ सईदा खान, प्रकाश दरेकर, नितेश सिंह, अजंता यादव, प्रिती सातम, संध्या दोषी, स्वप्ना म्हात्रे आदींनी भाग घेत भटके कुत्रे, रेबीज प्रतिबंधक लस आणि कुत्र्यांचे निर्बिजीकरण केंद्र तसेच शेल्टर होम आदींबाबत चिंता व्यक्त केली. यावर अतिरिक्त आयुक्त डॉ अविनाश ढाकणे यांनी अशासकीय संस्थांमार्फत श्वान निर्बिजीकरण व रेबीज लसीकरण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमांतंर्गत सन १९९४ ते जून २०२६ एकूण ४, ५४, ९८२ भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरण करण्यात आल्या आहेत. आठ अशासकीय संस्थांच्या माध्यमातून निर्बिजीकरण केंद्र चालवले जात आहे. सन २०१४मध्ये भटक्या श्वानांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्याप्रमाणे सन २०२४ मध्येही भटक्या श्वानांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या दोन्ही सर्वेक्षणातील अहवालानुसार भटक्या श्वानांची मुंबई शहरातील रस्त्यावरील घनता ही २२ टक्के ते २८ टक्क्यांने कमी झाल्याचा दावा केला आहे. सन २०२३ ते २०२६ पर्यंत १ लाख ५० हजार २३५ एवढ्या भटक्या श्वानांचे लसीकरण करण्यात आले आहे. मुंबईत भटक्या श्वानांच्या सर्वेक्षणासाठी भारतीय जीव जंतू कल्याण मंडळ यांनी निर्धारीत केलेल्या कार्यपध्दतीनुसार ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल इंडिया या जागतिक संस्थेमार्फत भटक्या श्वानांचे सर्वेक्षण जानेवार २०२४ मध्ये करण्यात आले. या जनगणनेनुसार मुंबईतील भटक्या कुत्र्यांची संख्या ९० हजार ७५७ एवढी आहे. (Rabies Injections)
पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात १० वर्षीय अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगी मंगळवारी ...
मुंबईत श्वानांसाठी शेल्टर होम हेे आणिक गाव, मुलुंड, ऐरोली जकात नाका, माहुल, मालवणी, मुंबई पोर्ट ट्रस्ट आदींच्या जागांवर उभारण्यात येणार आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार संस्थात्मक क्षेत्रातील भटक्या श्वानांची ओळख एआय मार्फत पटवण्यात आलेली असून त्यानुसार २३५६ संस्था असून त्यामध्ये ७,८५० भटकी श्वान आढळलेले आहेत. या निर्देशानुसार शाळा, कॉलेज, हॉस्पिटल आदी ठिकाणच्या भटक्या श्वानांना निवारा केंद्रात हलवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. (Rabies Injections)