Tuesday, August 18, 2026

Nashik Accident News : भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Nashik Accident News : भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Nashik Accident News : नाशिकमध्ये रस्ते अपघाताची भीषण दुर्घटना घडली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai-Agra Highway) दहाव्या मैलाजवळ हॉटेल अमृत पंजाब आणि गरवारे पॉईंट परिसरात मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकी घसरल्याने पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, धनंजय कुमार ठाकूर (रा. ओझर टाऊनशिप) असे या अपघातात मृत्यू झालेल्या वाहनचालकाचे नाव आहे. धनंजय ठाकूर हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत (DRDO) कामगार म्हणून कार्यरत होते. आज सकाळी कामावर जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक पूर्ववत केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, महामार्गावरील अर्धवट आणि अपूर्ण कामांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा