Pune News : पुणेकरांसाठी मोठी बातमी! पुरंदर विमानतळापर्यंत थेट बोगदा; मेट्रोसह वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग

पुणे : पुणे (Pune) आणि आसपासच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुरंदर येथे प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पुणे शहरातून जलद आणि सोयीने पोहोचता यावे, यासाठी राज्य सरकारने मोठी योजना आखली आहे. हडपसरपासून थेट पुरंदर विमानतळापर्यंत सुमारे 10 किलोमीटर लांबीचा दुहेरी बोगदा तयार करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.


पुण्यातील लोहगाव विमानतळावर सध्या प्रवासी आणि विमानसेवेचा वाढता ताण आहे. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन पुरंदर येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, पुणे शहरातून या विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी सुलभ आणि वेगवान वाहतूक व्यवस्था उभारणेही महत्त्वाचे आहे. त्यासाठी दिवे घाटाच्या खालून बोगदा तयार करण्याचा विचार करण्यात आला आहे. (Pune Airport)



या प्रस्तावित बोगद्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये दोन वेगवेगळ्या वाहतूक व्यवस्थांसाठी स्वतंत्र मार्ग असतील. एका मार्गावर मेट्रो धावणार असून दुसऱ्या मार्गावर सामान्य वाहनांची वाहतूक केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे शहरातून विमानतळापर्यंतचा प्रवास अधिक जलद आणि सोयीचा होऊ शकतो. (Pune Metro)


सध्या या प्रकल्पासाठी अनुभवी सल्लागाराची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सल्लागाराची नियुक्ती झाल्यानंतर बोगद्याच्या मार्गाचे सर्वेक्षण, तांत्रिक तपासणी आणि आराखडा तयार करण्याचे काम सुरू होईल. संपूर्ण आराखडा तयार करण्यासाठी सुमारे 6 ते 8 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यानंतर बोगदा नेमका कुठून सुरू होईल आणि कुठे संपेल, याचे चित्र स्पष्ट होणार आहे. (Purandar Airport)


या प्रकल्पाचा आराखडा महामेट्रोकडून तयार केला जाणार असल्याची माहिती आहे. मात्र, प्रत्यक्ष बांधकामाची जबाबदारी कोणत्या सरकारी यंत्रणेकडे सोपवली जाणार, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ किंवा महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ यापैकी एका यंत्रणेकडे प्रकल्पाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.


Comments
Add Comment

Mangalagaur 2026 : आजपासून मंगळागौरला सुरूवात...जाणून घ्या शुभ मुहूर्त, सोपी पूजा पद्धत अन् पौराणिक कथा!

श्रावणातील पहिल्या मंगळवारी मंगळागौरीचे आगमन श्रावण महिन्याची चाहूल लागताच संपूर्ण महाराष्ट्रात सणांची

Nitin Gadkari : पुणे ते संभाजीनगर २ तासांत, तर मुंबई-बंगळुरू अवघ्या ५ तासांत! नितीन गडकरींनी मांडला महामार्गांचा 'मास्टर प्लॅन'

पुणे : महाराष्ट्रातील रस्ते वाहतूक व्यवस्था अधिक गतीमान करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री

History of Ukadiche Modak : गणपती बाप्पा आणि मोदकाचं अतुट नातं! काय आहे उकडीच्या मोदकाचा पौराणिक आणि रंजक इतिहास?

मुंबई : गणेशोत्सव असो वा संकष्टी चतुर्थी, गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी 'मोदक' हा अग्रस्थानी असतो. लहानपणापासूनच

Auto Driver Marathi Test : ७ हजार ७५० रिक्षाचालक मराठी परीक्षेत नापास, ३० दिवसांची अंतिम मुदत

मराठी शिकण्यास टाळाटाळ करणाऱ्यांचे परमिट रद्द करणार मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी लागू करण्यात

Bhimashankar Accident : भीमाशंकर महामार्गावर भीषण अपघात; 2 रिक्षांना कारची धडक, 12 जण गंभीर जखमी

पुणे : श्रावण महिना, वीकेंडची सुट्टी आणि सोमवार असल्याने 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर

Pune Crime : पुण्यात रीलस्टार तरुणीचा 19 वर्षीय तरुणावर हल्ला; दोन तरुणींसह तिघांना अटक

पुणे :  पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरात किरकोळ वादातून 19 वर्षीय तरुणावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली