- मुख्यमंत्र्यांची मंजुरी; दीड वर्षांची प्रतीक्षा संपली
मुंबई : गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेला नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोमवारी दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री नियुक्तीला मंजुरी दिली आहे. त्यानुसार नाशिकच्या पालकमंत्री पदी भाजपचे ज्येष्ठ नेते जलसंपदा मंत्री (Girish Mahajan) गिरीश महाजन, तर रायगडच्या पालकमंत्री पदी शिवसेनेचे फलोत्पादन आणि रोहयो मंत्री गोगावले (Bharat Gogawale) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Girish Mahajan, Bharat Gogawale)
नाशिक जिल्ह्यावर वर्चस्व राखण्यासाठी महायुतीतील घटक पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे या जिल्ह्याचे राजकीय व प्रशासकीय महत्त्व अत्यंत वाढले आहे. भाजपव्यतिरिक्त शिवसेनेकडून मंत्री दादा भुसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) मंत्री छगन भुजबळ या पदासाठी उत्सुक होते. मात्र, नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन आणि विविध विकासकामांचा आढावा घेण्याची जबाबदारी आधीच 'कुंभपर्व मंत्री' म्हणून गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याकडे सोपवण्यात आली होती. आता गिरीश महाजन यांच्याकडेच नाशिकचे पालकमंत्री पद सोपवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. (Girish Mahajan, Bharat Gogawale)
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत अमेठी मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर काही काळ सक्रिय राजकारणापासून दूर राहिलेल्या स्मृती इराणी (Smriti Irani) पुन्हा एकदा ...
दुसऱ्या बाजूला, रायगड जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि स्थानिक शिवसेना नेत्यांमधील अंतर्गत वाद सर्वश्रुत होता. मंत्री आदिती तटकरे यांच्याकडेच रायगडचे पालकमंत्रिपद राहावे यासाठी सुनील तटकरे यांनी पूर्ण ताकद लावली होती. तर दुसरीकडे शिवसेनेच्या स्थानिक आमदारांनी हे पद भरत गोगावले यांनाच मिळावे असा पवित्रा घेतला होता. (Girish Mahajan, Bharat Gogawale)
महाराष्ट्रातील विविध विकासप्रकल्पांवर नवी दिल्लीत सविस्तर चर्चा नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज नवी दिल्ली येथे ...
या परस्परविरोधी भूमिकांमुळेच रायगडचा निर्णय रेंगाळला होता. मात्र, काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीदरम्यान वरिष्ठ पातळीवर यावर तोडगा काढण्यात आला. सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांना आमदार करण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांचे संख्याबळ महत्त्वाचे ठरले होते. त्या वेळी झालेल्या पडद्यामागील तडजोडीनुसार रायगडचे पालकमंत्रिपद शिवसेनेच्या पारड्यात टाकण्याचे निश्चित झाले होते. या निर्णयामुळे अखेर महायुतीतील दोन्ही महत्त्वाच्या जिल्ह्यांमधील पालकमंत्रिपदाची कोंडी फुटली आहे. (Girish Mahajan, Bharat Gogawale)