Sunday, August 16, 2026

Dombivli Local Train Accident : डोंबिवली लोकलच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू; पोस्टमार्टेम रिपोर्टने तपासाला नवे वळण

Dombivli Local Train Accident : डोंबिवली लोकलच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू; पोस्टमार्टेम रिपोर्टने तपासाला नवे वळण

डोंबिवली : डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. २ ऑगस्ट २०२६ रोजी कोपर आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान ही घटना घडली होती. सुरुवातीला हा प्रकार रेल्वे अपघात असल्याचे मानले जात होते. मात्र, तपासादरम्यान हा अपघात नसून आत्महत्येचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांना आला. (Dombivli Local Train Accident)

या प्रकरणातील पोस्टमार्टेम अहवालात मृत अल्पवयीन मुलगी तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आल्याने तपासाला गंभीर वळण मिळाले. त्यानंतर डोंबिवली रेल्वे पोलिसांनी तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित बाबींचा तपास सुरू केला.

इंस्टाग्रामवरून झाली होती ओळख :

डोंबिवली जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना पोलिसांनी मृत मुलीचा मोबाईल तपासला. मोबाईलमधील चॅटिंगच्या आधारे तिचे डोंबिवलीतील राज पकड या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. (Dombivli Local Train Accident)

पोलिसांनी राज पकडला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. आरोपीला कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्याला २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राज पकड हा एका खासगी कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास डोंबिवली रेल्वे पोलीस करत आहेत. (Dombivli Local Train Accident)

नंदुरबार बाललैंगिक अत्याचार प्रकरणात आणखी एक गुन्हा :

दरम्यान, नंदुरबारमध्ये बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात आरोपी चेतन कोळीविरोधात आणखी एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, चेतन कोळीवर २०२२ पासून लहान बालकांवर लैंगिक अत्याचार करून त्यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. तपासादरम्यान आरोपीच्या मोबाईलमध्ये ६६२ व्हिडिओ आणि एक हजारांहून अधिक अश्लील फोटो आढळल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. (Dombivli Local Train Accident)

आणखी तक्रारदार समोर येण्याची शक्यता :

चेतन कोळी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून न्यायालयाने त्याला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने पोलीस कोठडीत वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आणखी पीडित किंवा तक्रारदार समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. बाललैंगिक अत्याचाराशी संबंधित गुन्ह्यांची संख्या वाढल्यास विशेष तपास पथक अर्थात SIT स्थापन करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.

दोन्ही प्रकरणांमध्ये पोलीस तपास सुरू असून पुढील तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे लक्ष लागले आहे. (Dombivli Local Train Accident)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >