- काँग्रेसला विदर्भात मोठा धक्का; आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश
मुंबई : अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नगर परिषदेच्या काँग्रेसच्या नगराध्यक्षा मंदाकिनी भारसाकळे, नगर परिषदेचे १९ नगरसेवक, तसेच अकोल्यातील ज्येष्ठ नेते रामदास बोडके यांचे पुत्र दीपक बोडके आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह प्रहार संघटना, शौर्य सेना, आजाद समाज पक्ष व कर्नाटकातील बेळगाव येथील अनेक पदाधिकारी यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. हा प्रवेश आमदार तथा माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. ( Daryapur Municipal Council)
या प्रवेशामुळे दर्यापूर नगर परिषदेत काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, विदर्भात शिवसेनेची संघटनात्मक ताकद आणखी बळकट झाली आहे. त्याचप्रमाणे उबाठाचे जिल्हाप्रमुख डॉ. राज बोरकर, संदीप मेश्राम, सचिन कुंभारे, केतन सहारे, पंकज बोरकर आणि श्रीकांत रामटेके, प्रहारचे बेळगाव जिल्हाध्यक्ष शिवकुमार बोधले, बेळगाव तालुका अध्यक्ष दीपक बोधले, युवा अध्यक्ष बेळगाव जिल्हा रोहित पाटील, मांगुर शाखाप्रमुख सुरेश हेमाजे यांच्यासह अन्य पदाधिकारी सदस्य कार्यकर्त्यांनी ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
- 'जलसंपदा' आणि 'पर्यटन' विभागाचा संयुक्त उपक्रम; जायकवाडी, कोयना, उजनीसह १० प्रमुख धरणांचा समावेश मुंबई : अथांग जलसाठा आणि निसर्गरम्य परिसर लाभलेल्या ...
मुंबई स्थित नंदनवन या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या प्रवेश सोहळ्यात बोलताना शिंदे यांनी नव्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत केले. ते म्हणाले की, “दर्यापूरच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि विकासकामांना महायुती सरकारची संपूर्ण साथ राहील. विदर्भात सर्वसामान्य, शेतकरी, दिव्यांग आणि वंचित घटकांसाठी बच्चू कडू यांनी सातत्याने संघर्ष केला आहे. त्यामुळे विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा शिवसेनेकडे वाढता ओढा हा जनविश्वासाचा पुरावा आहे", असे त्यांनी नमूद केले.