मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईतील चेंबूर परिसरात 'पार्ले अॅग्रो' कंपनीच्या गोदामावर अचानक धाड टाकून, मुदत संपलेल्या (एक्सपायरी डेट) फ्रुटी, अॅपे फिज, कोल्ड ड्रिंक्स आणि कॅन्डी ज्यूसचा १ लाख रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त केला आहे. चेंबूर येथील वाशीनाका परिसरातील एल. यु. गडकरी मार्गावरील प्रयाग नगरमधील गोदामावर ही कारवाई करण्यात आली. एफडीएच्या आठ अधिकाऱ्यांच्या पथकाने १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता सुरू केलेले हे शोधकार्य १४ ऑगस्टच्या पहाटे ५ वाजेपर्यंत सलग ११ तास सुरू होते.
मुंबई : "विधानसभा अध्यक्ष म्हणून आमदार अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेणे ही माझी घटनात्मक जबाबदारी होती. या प्रकरणात १० व्या परिशिष्टातील तरतुदी आणि ...
तपासणीदरम्यान मुदत संपलेल्या उत्पादनांचा मोठा साठा आढळून आल्यानंतर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी संबंधित गोदाम सील केले आहे. याशिवाय मालाची वाहतूक करण्यासाठी वापरली जाणारी दोन वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. एफडीएचे पुढील आदेश येईपर्यंत या गोदामातून कोणत्याही अन्नपदार्थाची विक्री किंवा वाहतूक करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
उद्योग आणि नवीन नोंदणीत महाराष्ट्रच देशात प्रथम क्रमांकावर https://prahaar.in/2026/08/14/power-supply-suspended-between-kalyan-and-badlapur-shutdown-in-these-areas-from-6-am-to-11-am/ मुंबई : संसदेत विचारलेल्या प्रश्नाच्या ...
राज्यात अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या निकषांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्यपदार्थ निर्मिती संस्था आणि हॉटेल्सवर एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईची मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत १२ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध 'डोमिनोज पिझ्झा' चालवणाऱ्या जुबिलेंट फूडवर्क्स लि.च्या चार आऊटलेट्सचे खाद्य व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले आहेत. यामध्ये मुंबईतील विलेपार्ले (पश्चिम), बोरीवली (पश्चिम) आणि घाटकोपरच्या आर-सिटी मॉल मधील तीन, तर सातारा जिल्ह्यातील एका आऊटलेटचा समावेश आहे.
मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता दिग्दर्शित हा सर्वनाश करणारा झोम्बी ...
तपासणीदरम्यान या आऊटलेट्समध्ये एफएसएसएआय परवाना न दर्शवणे, पिण्याच्या पाण्याची अनुपलब्धता, अन्न साठवणुकीतील त्रुटी, कीटक नियंत्रणाचा (पेस्ट कंट्रोल) अभाव आणि स्वच्छतेच्या मानकांचे उल्लंघन आढळून आले होते. बोरीवली येथील आऊटलेटमध्ये १५ टक्के नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले. या सर्व आऊटलेट्सना कच्चे व शिजवलेले अन्न वेगळे ठेवणे, शाकाहारी व मांसाहारी पदार्थांमध्ये फरक ठेवणे, फ्रीझरचे तापमान नियंत्रित ठेवणे आणि उपकरणांची नियमित स्वच्छता करण्याचे निर्देश एफडीएकडून देण्यात आले आहेत.






