मुंबई : नांदेड जिल्ह्यात शिवसेनेच्या संघटनवाढीला आणखी बळ मिळाले आहे. शंकरअण्णा धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार बालाजी कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्षांतील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईतील नंदनवन बंगल्यावर झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले.
नाळेश्वर, राहटी आणि पिंपळगाव (कोरका) यांसह नांदेड जिल्ह्यातील विविध भागांतील कार्यकर्ते या पक्षप्रवेशात सहभागी झाले. नाळेश्वर येथील माजी जिल्हा परिषद सभापती नरहरी ठाकराम वाघ, माजी सरपंच रुपेश केशवराव वाघ, ग्रामपंचायत सदस्य बालाजी व्यंकटी इंगोले, बालाजी दत्ता भारती आणि शालेय व्यवस्थापन समितीचे बळीराम उत्तम वाघ यांचा प्रवेश करणाऱ्यांमध्ये समावेश आहे.
राहटी येथील भोजराज बोकारे, रावसाहेब बोकारे, गोविंद बोकारे, भागवत बोकारे, लक्ष्मण बोकारे आणि रतन बोकारे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. पिंपळगाव (कोरका) येथील नागेश बडवणे, जिल्हा परिषद सदस्य बाळगीर खुशालगिरी महाराज, दत्तरामजी बडवणे, बालाजीराव डुकरे, रावसाहेब सूर्यवंशी आणि गोविंदराव जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते पक्षात दाखल झाले.
मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मत्स्य ...
नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना एकनाथ शिंदे यांनी आमदार बालाजी कल्याणकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. कल्याणकर यांच्या मतदारसंघात विकासकामे झाली असून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न झाल्यामुळे त्यांना जनतेचा पुन्हा पाठिंबा मिळाला, असे शिंदे यांनी सांगितले.
शिवसेनेची भूमिका ‘80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण’ अशी असल्याचेही शिंदे यांनी यावेळी सांगितले. आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात सर्वसामान्य, महिला, शेतकरी, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना राबवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
शंकरअण्णा धोंडगे यांनी यापूर्वी शेतकरी नेते शरद जोशी यांच्यासोबत काम केले असल्याचा उल्लेखही शिंदे यांनी केला. नांदेडमध्ये विविध भागांतील कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होत असल्याने पक्षाच्या संघटनविस्ताराला वेग मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
महायुती सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण करण्यावर भर दिला असून, सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या शिवसेनेवर नागरिकांचा विश्वास वाढत असल्याचा दावा शिंदे यांनी केला. आगामी काळात नांदेडसह राज्यातील संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.






