गौतम अदानी यांच्यावरील अमेरिकेतील फौजदारी खटला रद्द

नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरोधात अमेरिकेत दाखल करण्यात आलेला लाचखोरी आणि आर्थिक फसवणुकीचा गुन्हेगारीचा खटला तेथील फेडरल न्यायालयाने रद्द केला. त्यामुळे गेल्या पावणेदोन वर्षांपासून सुरू असलेल्या या हाय-प्रोफाइल कायदेशीर संघर्षाला अखेर पूर्णविराम मिळाला. ब्रुकलिन येथील न्यायाधीश निकोलस गारॉफिस यांनी हा खटला रद्द करण्यास मंजुरी दिली आहे.



गौतम अदानी यांच्यासोबत त्यांचे पुतणे सागर अदानी आणि अन्य सहा जणांविरोधातही अमेरिकेत आरोप निश्चित केले होते. मात्र, अमेरिकेच्या न्याय विभागाने आता हा खटला पुढे न चालवण्याचा निर्णय घेतल्याने गौतम अदानी आणि इतर आरोपींविरोधातील हे फौजदारी प्रकरण संपुष्टात आले. अमेरिकेच्या न्याय विभागाने याच वर्षी मे महिन्यात अदानी यांच्याविरोधातील फौजदारी आरोप मागे घेण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. हा खटला पुढे सुरू ठेवणे अमेरिकेच्या सार्वजनिक हिताचे नसल्याचा युक्तिवाद न्याय विभागाने केला. या निर्णयामागे प्रामुख्याने तीन कारणे देण्यात आली. या प्रकरणातील कथित गैरप्रकारांचा मोठा भाग अमेरिकेबाहेर, विशेषतः भारतात घडल्याचा दावा करण्यात आला. तसेच परदेशात पुरावे आणि साक्षीदार मिळवणे कठीण असल्याचे न्याय विभागाने सांगितले. याशिवाय, सध्या न्याय विभागाने आपल्या अंमलबजावणीच्या प्राधान्यक्रमांमध्ये बदल केला असल्याचेही न्यायालयाला सांगण्यात आले. न्यायाधीश गारॉफिस यांनी न्याय विभागाच्या या निर्णयाबाबत काही गंभीर प्रश्न उपस्थित केले. मात्र, सरकारला एखादा फौजदारी खटला पुढे चालवायचा की नाही, याबाबत व्यापक अधिकार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे निर्णय प्रक्रियेबाबत चिंता व्यक्त करूनही त्यांनी आरोप मागे घेण्यास अखेर मंजुरी दिली आहे.



नोव्हेंबर २०२४ मध्ये अमेरिकन सरकारी वकिलांनी भारतीय उद्योगपती गौतम अदानी , त्यांचे पुतणे सागर अदानी आणि अन्य आरोपींविरोधात गंभीर आरोप केला होता. भारतात सौरऊर्जा प्रकल्पांचे कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना सुमारे २६५ दशलक्ष डॉलर (सुमारे २,२०० कोटी रुपये) लाच देण्याच्या कथित योजनेत हा आरोप केला होता. या कंत्राटांमधून अब्जावधी डॉलरचा नफा मिळण्याची अपेक्षा असल्याचा दावा केला होता. मात्र, अदानी समुहाने सुरुवातीपासूनच हे आरोप फेटाळून लावले असून कोणतीही गैरकायदेशीर कृती केल्याचे नाकारले होते.
Comments
Add Comment

Gatari Amavasya : गटारीच्या दिवशीच सूर्यग्रहण? नॉन वेज खाण्यापूर्वी 'हे' नक्कीच जाणून घ्या...

मुंबई :  महाराष्ट्रात गटारी अमावस्या म्हणून ओळखली जाणारी आषाढ दीप अमावस्या यंदा 12 ऑगस्ट 2026 रोजी येत आहे. श्रावण

Eknath Shinde : दूध, पनीरसह अन्न भेसळखोरांवर संघटीत गुन्हेगारी अंतर्गत कारवाई करा!

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश; कायदे तज्ज्ञांची समिती तयार करण्याची सूचना मुंबई : नागरिकांच्या

Nashik : शेकडो अनोळखींसाठी आधार ठरलेला विशाल काळाच्या पडद्याआड

Nashik : संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या अनेक सर्वसामान्य आणि अनोळखी लोकांच्या मदतीला धावून जाणारा नाशिक (Nashik)

Ajay Devgan : बाॅलिवूडचा सिंघम 'अजय देवगण' लवरकच झळकणार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत

मुंबई : बॉलिवूडचा सिंघम म्हणून ओळखला जाणारा अभिनेता 'अजय देवगण' आता सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अजय

Nashik : नाशिक-नांदुरी रस्त्याच्या रुंदीकरण कामाची पाहणी, गुणवत्ता निकषांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश

Nashik : सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या (Simhastha Kumbh Mela 2027) पार्श्वभूमीवर नाशिक–नांदुरी रस्त्याच्या (Nashik-Nanduri road) सुरू असलेल्या

Monsoon Health Tips : पावसाळ्यात आजारांपासून दूर राहायचंय? ‘हे’ सोपे उपाय करा; आरोग्य राहील एकदम फिट!

मुंबई : पावसाळा सुरू झाला की वातावरण आल्हाददायक होतं, पण त्याचबरोबर सर्दी, खोकला, ताप, पोटाचे विकार, त्वचेचे संसर्ग