Gold Rate : सोने - चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ होणार!

मुंबई : श्रावण महिना सुरू होताच सोने - चांदी खरेदीदारांची रेलचेल वाढू लागते. येत्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा जबरदस्त तेजी पाहायला मिळणार आहे. काही काळाच्या करेक्शननंतर बुलियन मार्केटमध्ये खरेदीदारांचा ओघ वाढला आहे. सोने चांदी बाजारातील एकूणच घोडदौड पाहता चांदीचे भाव सोन्याच्या भावापेक्षा अधिक आहेत. मुंबईत एक तोळे म्हणजेच (१० gram) सोन्याचा दर २४ कॅरेटसाठी रू. १,५५,१३० आहे तर २२ कॅरेटसाठी रू. १,४२,२०० इतका आहे. तसेच एक किलो चांदीचा दर २,३४,००० ते २,५५,००० आहे.



आकडेवारीची गणिते...


समोर आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात ७ टक्क्यांनी तर चांदीच्या दरात ११ टक्क्यांनी वाद झालेली दिसून येते. तसेच एका महिन्याची सरासरी लक्षात घेता सोने ९ टक्क्यांनी तर चांदी १२ टक्क्यांनी महागली आहे. आता सर्वांचेच लक्ष लागले आहे की सोने चांदीचे दर अजून किती मोठी झेप घेणार आहेत.




सोने चांदीचे दर अचानक का वाढले?


सोने चांदीच्या दरात इतकी वाढ होण्यामागे काही विशेष जागतिक कारणे आहेत. अमेरिकन रोजगार बाजारात कमजोरीचे संकेत मिळाले आहेत, म्हणजेच तेथे नोकऱ्यांची स्थिती आधीच्या तुलनेत मंदावली आहे. रोजगार डेटा कमजोर आल्याने अमेरिकन फेडरल रिझर्व्ह सप्टेंबरमध्ये व्याजदर वाढवण्याची शक्यता आधी ७० टक्के मानली जात होती, ती आता घटून ३५ टक्क्यांवर आली आहे. जेव्हा व्याजदर वाढीची शक्यता कमी होते, तेव्हा गुंतवणूकदारांचा पैसा सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोन्या-चांदीकडे वळतो. डॉलरमधील घसरण हेदेखील सोने चांदीच्या दरात वाढ होण्याचे मुख्य कारण असू शकते.



दिवाळीपर्यंत सोन्याचा दर किती वाढेल ?


विश्लेषकांच्या अंदाजानुसार, या वर्षाच्या अखेरपर्यंत किंवा दिवाळीच्या आसपास सोन्यात आणखी १० ते १५ टक्क्यांची वाढ पाहायला मिळू शकते. परंतु या दरांमध्ये वाढ किंवा घटही होऊ शकते. सोने - चांदी यांचे दर अमेरिकन व्याजदर, डॉलरची हालचाल, जागतिक राजकीय तणाव, मध्यवर्ती बँकांची खरेदी आणि स्थानिक मागणी यांसारख्या प्रमुख घटकांवर आधारित असतात.

Comments
Add Comment

Simhastha KumbhMela : कुंभमेळ्यासाठी अहिल्यानगर प्रशासन सज्ज, शिर्डी, शनिशिंगणापूरमध्ये पर्यायी पार्किंगची तयारी

Ahilyanagar : नाशिक कुंभमेळ्याच्या (Kumbh Mela) पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाकडून शिर्डी आणि शनिशिंगणापूरसाठी

Mumbra Railway Accident : मुंब्रा रेल्वे पुलाजवळ लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट

मुंबई : मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावर (Mumbai Local Train) मंगळवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. चालत्या लोकलमधून पडल्याने 27

Cabinet Meeting : भूसंपादनाच्या मोबदल्यास विलंब झाल्यास 'आरबीआय' पेक्षा अधिक व्याज; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना मुद्रांक आणि हस्तांतरण शुल्कात भरघोस

Shalarth ID Scam : 160 कोटींच्या ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यात पोलीस ठाण्यातच रजिस्टरमध्ये फेरफार, सीसीटीव्हीत धक्कादायक प्रकार कैद

Shalarth ID Scam : तब्बल १६० कोटी रुपयांच्या ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याच्या तपासात दिवसेंदिवस धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Pune news : पुणेकरांच्या खिशाला झळ! रिक्षा भाडेवाढीसह ई-रिक्षा आणि शेअर रिक्षेबाबत मोठे निर्णय

पुणे : पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत पुणे शहर आणि परिसरातील वाहतुकीशी संबंधित अनेक महत्त्वाचे

Nashik : नाशिक-नांदुरी रस्त्याच्या रुंदीकरण कामाची पाहणी, गुणवत्ता निकषांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश

Nashik : सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या (Simhastha Kumbh Mela 2027) पार्श्वभूमीवर नाशिक–नांदुरी रस्त्याच्या (Nashik-Nanduri road) सुरू असलेल्या