Jawharla Earthquake : पालघर जिल्हा हादरला! जव्हारला भूकंपाचे सलग धक्के! ४ वेळा हादरली जमीन

- नागरिकांनी भीतीच्या सावटाखाली जागून काढली रात्र


पालघर : पालघर जिल्ह्यातील जव्हार परिसराला सोमवारी रात्री भूकंपाच्या सलग धक्क्यांनी हादरवून सोडले. रात्री १० वाजल्यानंतर काही तासांच्या अंतराने जाणवलेल्या कंपनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक नागरिकांनी घाबरून घराबाहेर धाव घेतली आणि रस्त्यावर आश्रय घेतला. काही नागरिकांनी मध्यरात्रीनंतरही घरात जाणे टाळल्याने जव्हारवासीयांनी अक्षरशः भीतीच्या सावटाखाली रात्र जागून काढली. (Jawharla Earthquake)



रात्री दोन मोठे धक्के; नागरिकांमध्ये घबराट


सोमवारी रात्री १०.०४ वाजता ३.२ तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जव्हार परिसरात जाणवला. या भूकंपाचे केंद्र डेंगाचीमेट परिसरात असल्याची प्राथमिक माहिती आहे. अचानक घरांमध्ये कंप जाणवल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. अनेकांनी खबरदारी म्हणून तातडीने घराबाहेर पडत रस्त्यावर थांबणे पसंत केले. काही वेळाने परिस्थिती शांत होत असल्याचे वाटत असतानाच रात्री ११ वाजता पुन्हा ३.४ तीव्रतेचा धक्का जाणवला. या धक्क्याचे केंद्र डेंगाचीमेट गावाजवळील हडे गावातील श्री जगदंबा माता मंदिर परिसर असल्याचे सांगण्यात आले. दुसरा धक्का तुलनेने अधिक तीव्र असल्याने नागरिकांची चिंता आणखी वाढली. (Jawharla Earthquake)



मध्यरात्रीनंतरही आफ्टरशॉकची धास्ती :


दोन धक्क्यांनंतरही नागरिकांची भीती कमी झाली नाही. रात्री ११.३९ आणि मध्यरात्री १२.०५ वाजता पश्चात धक्के (आफ्टरशॉक) जाणवल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. एखादा मोठा भूकंप पुन्हा होण्याची भीती असल्याने अनेक नागरिक मध्यरात्रीनंतरही काही तास घराबाहेर राहिले. अचानक जाणवणाऱ्या कंपनांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. भूकंपानंतर जव्हार शहरात कुत्र्यांचे असामान्य भुंकणे तसेच काही पक्ष्यांचे विचित्र आवाज नागरिकांच्या निदर्शनास आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आधीच घाबरलेल्या नागरिकांमध्ये आणखी संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. (Jawharla Earthquake)



मोठ्या नुकसानीची नोंद नाही :


भूकंपाचे धक्के जाणवले असले तरी आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. धक्के सौम्य स्वरूपाचे असल्याचे सांगितले जात असले तरी सलग कंपन जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये भीती कायम आहे. या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणांना सतर्क केले असून, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती कमी करण्यासाठी जव्हार परिसरात जनजागृती अभियान हाती घेण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. (Jawharla Earthquake)



भूकंपाची अधिकृत नोंद उशिराने; नागरिकांमध्ये संभ्रम :


भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर अधिकृत भूकंप नोंद प्रणालीवर तातडीने माहिती उपलब्ध न झाल्याने काही काळ नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने या घटनांची नोंद घेतली असून, परिसरातील परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. (Jawharla Earthquake)



सापुताराही हादरला; एकाच दिवसात चार धक्के :


जव्हारसोबतच गुजरातमधील सापुतारा परिसरातही सोमवारी दिवसभरात चार भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे आणि राहुडे गावांच्या परिसरात सकाळपासून रात्रीपर्यंत हे धक्के नोंदवण्यात आल्याचे सांगण्यात आले. (Jawharla Earthquake)



नोंदवण्यात आलेल्या धक्क्यांमध्ये:


- सकाळी ७.५३ वाजता – २.९ तीव्रता
- सकाळी ९.५० वाजता – २.७ तीव्रता
- दुपारी २.३८ वाजता – २.० तीव्रता
- रात्री ९.३८ वाजता – २.८ तीव्रता


अशा प्रकारे सापुतारा परिसरात दिवसभरात चार वेळा जमिनीचे कंपन जाणवले.


जव्हार आणि सापुतारा परिसरात एकाच दिवशी भूकंपाचे वारंवार धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. (Jawharla Earthquake)

Comments
Add Comment

Ashish Shelar : झारखंडमधील विद्यार्थी मारहाणीवर राज-उद्धव ठाकरे गप्प का; मंत्री आशिष शेलार यांचा सवाल

 'मातोश्री' आणि 'शिवतीर्थ'वरून सोयीची

Nashik : त्र्यंबकेश्वर देवस्थानचा व्हीआयपी दर्शनाबाबत मोठा निर्णय

Nashik : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर देवस्थानने व्हीआयपी दर्शनाबाबत मोठा

Virar Fake Currency : विरारमध्ये बनावट नोटांचा मोठा पर्दाफाश! १ कोटींच्या नकली नोटा जप्त; ३० लाखांत विक्रीचा कट उधळला

वसई : वसई क्राईम ब्रँच युनिट-२ ने मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोठी कारवाई करत १ कोटी रुपये दर्शनी मूल्य असलेल्या

Nashik : चार महिन्यांपूर्वीचा काँक्रिटीकरण झालेला रस्ता पुन्हा फोडला, नाशिक महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

Nashik : नाशिक शहरातील सीबीएस ते कॅनडा कॉर्नरदरम्यान (CBS to Canada Corner) अवघ्या चार महिन्यांपूर्वी काँक्रिटीकरण करण्यात आलेला

Nashik Crime : आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार, प्रकरण दाबण्यासाठी आजीची हत्या ? जिल्ह्यात खळबळ

Nashik Crime News : सिन्नर तालुक्यातुन एक संतापजनक घटना समोर आली आहे. तालुक्यातील वावी परिसरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Maharashtra Weather Update : मान्सूनचा ब्रेक संपणार! १३ ऑगस्टपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा धुमाकूळ

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी मान्सून पुन्हा जोर