Alexandra Cinema in Nagpada : नागपाड्यातील अलेक्झाड्रा सिनेमागृहाची ओळख कायमचीच मिटणार

- सिनेमागृहाचे आरक्षण बदलून निवासी वापराचे आरक्षण टाकले जाणार; सुधार समितीच्या बैठकीत प्रस्ताव सादर


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भायखळा नागपाडा येथील अलेक्झाड्रा सिनेमागृहाची जुनी ओळख ही वास्तू धोकादायक झाल्यामुळे बंद करून पुसली गेली. त्यातच आता याठिकाणी कधी काळी अलेक्झाड्रा सिनेमा गृह होते याचीही कायमस्वरुपी ओळख आता पुसून टाकली जाणर आहे. या सिनेमा गृहाच्या जागेवर आता निवासी इमारत बांधण्याचा विचार असून त्यासाठी यावरील सिनेमागृहाचे आरक्षण रद्द करून रहिवाशी तथा निवासी वापर अशाप्रकारचे आरक्षण टाकले जाणार आहे. त्यामुळे भायखळा नागपाडा येथील सिनेमागृह होते याचाही लोकांना विसर पडला जाणार आहे. (Alexandra Cinema in Nagpada)



मुंबईच्या विकास आराखडा-२०३४मध्ये भायखळा येथील न.भू.क्र. ३३९ या भूखंडावरील ‘सिनेमागृह ही विद्यमान सुविधा रद्द करून सदर भूखंडाचा ‘रहिवासी/निवासी वापर क्षेत्रात’ समावेश करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सुधार समितीसमोर मांडण्यात आला आहे. या भूखंडाचा मालकाच्यावतीने महापालिका विकास नियोजन विभागाकडे अर्ज करण्यात आला होता. त्यानंतर महापालिकेच्या विकास नियोजन विभागाने या मागणीचा विचार करून पुढील कार्यवाहीसाठी प्रस्ताव नगर विकास विभागाकडे पाठविला आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडूनही या संदर्भात पत्रव्यवहार झाल्याचे कागदपत्रांत नमूद आहे. विकास आराखडा-२०३४मधील संबंधित आरक्षण, जमीन वापर आणि त्यातील प्रस्तावित बदल यांचा विचार करून निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. (Alexandra Cinema in Nagpada)



अलेक्झाड्रा सिनेमा हे चित्रपटगृह सन २००७ पासून बंद आहे. सध्याची जागेची परिस्थिती तसेच मनोरंजन क्षेत्रातील बदलत्या प्रवृत्तीमुळे चित्रपटगृह चालवणे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य राहिलेले नाही. परिणामी हे चित्रपटगृह जवळपास गेल्या २० वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. ही मारत अत्यंत जीर्ण व मोडकळीस आलेल्या अवस्थेत असून त्याची स्थिती दिवसेंदिवस अधिकच खराब होत असल्याचे अर्जदारांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. (Alexandra Cinema in Nagpada)


सध्या न.भू.क्र. ३३९ हा भूखंड सिनेमागृह या सार्वजनिक/मनोरंजन सुविधेसाठी दर्शविला आहे. त्यामुळे प्रस्ताव मंजूर झाल्यास या आरक्षणात बदल होऊन भूखंडाला निवासी वापराची परवानगी मिळू शकते. त्यामुळे भविष्यात सदर भूखंडावर निवासी विकासाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. (Alexandra Cinema in Nagpada)

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील नगरसेवकांना हवाय १ कोटींचा निधी

- नगरसेवक स्वेच्छा निधीची मर्यादा ६० लाखांवरून १ कोटींची करण्याची मागणी - भाजप नगरसेविकेने केली महापालिकेत

Gargai Water Project : गारगाई पाणी प्रकल्पासाठी मेक्सिकोतील कंपनीची सल्लागार म्हणून निवड

- मेक्सिकोतील धरणांचे आणि मुंबईत मेट्रोचे काम पाहणाऱ्या संस्थेवर जबाबदारमुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई

BMC News : परळ,शिवडी,लालबागला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीची पुनर्बांधणी

- पाणी साठ्याची क्षमता १०.३३ दशलक्ष लिटर्स करणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) परळ, शिवडी तसेच लालबाग भागाला पाण पुरवठा

FDA Action on Blinkit : FDAचा ब्लिंकिटवर मोठा दणका! मालाडमधील गोदामाचा अन्न परवाना निलंबित; झुरळे, अस्वच्छता अन् नियमभंग उघड

मुंबई : राज्यभर अन्न सुरक्षेचे नियम मोडणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई सुरू केली

Holiday : मुंबईत दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनला मिळणार शासकीय सुट्टी

मुंबई : यंदा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनच्या दिवशी शासकीय सुट्टी मिळणार आहे. या

National Highway : राष्ट्रीय महामार्गालगत नवीन ढाबे, हॉटेल्स आणि व्यावसायिक बांधकामांना बंदी

राज्य सरकारचा निर्णय; अनधिकृत बांधकामे ६० दिवसांच्या आत पाडण्याचे निर्देश मुंबई : राष्ट्रीय महामार्गांवर