चेन्नई : प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान (A R Rahman) यांचा मुलगा आणि गायक ए.आर. आमीन (A R Ameen) याचा कार अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चेन्नईतील काठीपारा फ्लायओव्हरवर आमीनच्या पॉर्श कारची दुसऱ्या वाहनाला धडक झाली. या अपघातात आमीन आणि त्याचा मित्र सुदैवाने बचावले असून, दोघांनाही गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी आमीन आपल्या मित्रासोबत पॉर्श कारने कोयंबेडूच्या दिशेने जात होता. काठीपारा फ्लायओव्हरजवळ पोहोचताच बाजूच्या रस्त्यावरून एक वॅगन-आर अचानक मुख्य मार्गावर आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर दोन्ही वाहनांची धडक झाली. अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. (A R Rahman Son Accident)
नागपूर : नागपुरातील महाल (Mahal) परिसरातील बडकस चौकात एका व्यक्तीवर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) ...
घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि प्रत्यक्षदर्शींनी आमीन व त्याच्या मित्राला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी दोघांची तपासणी केली. सुदैवाने त्यांना गंभीर दुखापत झाली नसून, किरकोळ दुखापतींवर उपचार केल्यानंतर त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती आहे. एअरबॅग आणि कारमधील सुरक्षा यंत्रणांमुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे. (Accident News)
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच ए.आर. रहमान यांच्या चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. मात्र, आमीन सुखरूप असल्याचे समोर आल्यानंतर चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. अपघातप्रकरणी पोलिसांनी नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. (Bollywood News)
ए.आर. आमीनने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत संगीत क्षेत्रात आपली कारकीर्द सुरू केली आहे. मणिरत्नम यांच्या ‘ओ कधल कनमनी’ या चित्रपटातील ‘मौला सल्ली’ या गाण्याद्वारे त्याने पार्श्वगायन क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर
नागपूर : नागपुरातील महाल (Mahal) परिसरातील बडकस चौकात एका व्यक्तीवर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) ...